
पनवेल, दि.२०(वार्ताहर): पनवेल शासकीय विश्रामगृह येथे पनवेल तालुक्यातील पत्रकारांनी ज्येष्ठ पत्रकार संजय कदम ज्येष्ठ पत्रकार आप्पासाहेब मगर यांची शासनाच्या वंदे मातरम कमिटी वरती नियुक्ती केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाची प्रस्तावना पत्रकार मुकेश शिंदे तर पत्रकार अण्णासाहेब आहेर यांनी जेष्ठ पत्रकारांचे कौतुक केले व उपस्थित पत्रकारांचे आभार मानले या कार्यक्रमाचे आयोजन रायगड सम्राट संपादक शंकर वायदंडे व पत्रकार मुकेश शिंदे यांनी केले
बंकीमचंद्र चटटोपध्याय यांनी 1857 साली लिहिलेले वंदे मातरम या गीतास स्वातंत्र लढयात तसेच स्वातंत्रोत्तर कालखंडातही अनन्ययाधारण महत्व प्राप्त आहे. आनंदमठ या कादंबरीतील हे गीत भारतमातेच्या स्तृतीचे प्रतीक असून, स्वातंत्र्य लढयातील असंख्य क्रांतीकारकांना प्रेरणादायी ठरलेले आहे.
या गीतास दिनांक. 07 नोव्हेंबर, 2025 रोजी 150 वर्ष पूर्ण होत आहे.त्यानिमित्ताने शासन निर्णयानुसार, राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये वंदे मातरम गीताच्या 150 व्या वर्धापन दिनाचे यशस्वी आयोजनासाठी अपर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरिय समिती स्थापन करण्यात येत आहे. यामध्ये पनवेलमधील ज्येष्ठ पत्रकार संजय कदम व खारघर येथील ज्येष्ठ पत्रकार आप्पासाहेब मगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब मगर यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी पत्रकार लालचंद यादव, शंकर वायदंडे, सुनील वारगडा, प्रकाश मत्रे, शेखर सपाने, संदेश सोनमळे, अण्णासाहेब आहेर, संतोष आमले, मुकुंद कांबळे, कैलास नेमाडे आदींनी उपस्थित राहून शुभेच्छा चा वर्षाव केला
फोटो: सत्कार



Be First to Comment