
रायगड – हिंदु जनजागृती समितीने मुंगोशी येथील श्री जय हनुमान व्यघरेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता उपक्रम राबविला. मंदिरातील दर्शनमार्ग, सभोवतालचा परिसर, तसेच मंदिर कळसाच्या येथील छताची स्वच्छता करण्यात आली. 16 नोव्हेंबरला पार पडलेल्या या उपक्रमात रायगड जिल्यातील अनेक तरुण मुलामुलींनी मनापासून सहभाग घेतला.
हिंदु जनजागृती समिती गेल्या काही वर्षांपासून मंदिर स्वच्छता, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सातत्यपूर्ण मोहीमा राबवत असून, तरुण पिढीमध्ये स्वच्छता व इतिहास-संवर्धनाची जाण निर्माण करण्याचे काम करत आहे.
या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, अशा उपक्रमांमुळे गावातील धार्मिक स्थळे स्वच्छ, सुरक्षित आणि आकर्षक राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.



Be First to Comment