
पनवेल दि.१८(संजय कदम) : कळंबोली वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणामुळे दुचाकी वरून पडलेली सोन्याच्या दागिन्यांची बॅग संबंधित व्यक्तींशी संपर्क साधून ती त्यांना परत करण्यात आल्याने मलबारी कुटुंबीयांनी कळंबोली वाहतूक पोलिसांचे आभार मानले आहेत.
स्वप्नील श्याम मलबारी रा खारघर हे आपल्या कुटुंबियांसह वाहनावरून कळंबोली सर्कल येथून जात असताना सोन्याचे दागिने, मोबाईल फोन व रोख रक्कम असलेली बॅग ती त्या परिसरात खाली पडली परंतु ही बाब त्यांच्या लक्षत आली नाही आणि ते पुढे निघून गेले. दरम्यान तेथे कर्तव्यावर असणारे पोळीला हवालदार भोईर व पोलीस शिपाई राठोड यांच्या निदर्शनास ही बॅग आली. ताडोबाने सदर बॅग त्यांनी ताब्यात घेऊन मलबारी कुटूंबियांशी संपर्क साधून आतील गोष्टींची शहानिशा करून सदर बॅग मलबारी कुटुंबियांना परत केली. यावेळी मलबारी कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले व त्यांनी वाहतूक शाखेचे आभार मानले आहेत.



Be First to Comment