
पनवेल – येथे 16 नोव्हेंबर या दिवशी प्रथमोपचार प्रशिक्षण आणि त्याचे दैनंनंदिन जीवनातील महत्व या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
हिंदू जनजागृती समितीतर्फे प्रथमोपचार प्रशिक्षण दिले जाते. प्रत्येक नागरिकाला प्रथमोपचाराचे प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. यादृष्टीने ठिकठिकाणी त्याविषयीचे प्रशिक्षण वर्ग घेतले जातात.
याचाच एक भाग म्हणून पनवेल येथे प्रथमोपचार प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले होते .
या प्रवचनात रुग्णाची नाडी पडताळणी कशी करावी, पालथा रुग्ण सरळ कसा करावा, रुग्णाची प्राथमिक तपासणी कशी करावी याची प्रात्यक्षिके दाखवण्यात आले. तसेच अगंतुक वस्तू घशामध्ये अडकली असता उपचार कसा करावा, पायाचा घोटा मुरगळला असता RICE ( प्रथमोपचारची एक पद्धत) पद्धतीने उपचार कसा करावा, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
‘अशा प्रकारचे ज्ञान घ्यायला आम्हाला आवडेल. या ज्ञानामुळे आम्ही स्वतः च्या कुटुंबातील व्यक्ती व इतरांना सहाय्य करू शकतो, असे शिबिरार्थीनी सांगितले. या शिबिराचा 15 जणांनी लाभ घेतला.



Be First to Comment