
पेण, दि.17 (प्रतिनिधी) : पेण नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस नंदा म्हात्रे यांनी नगराध्यक्ष पदाकरिता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
यावेळी बोलताना काँग्रेस पक्षाचे जिल्हा निरीक्षक यांनी सांगितले की रायगड जिल्ह्याच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये पेणच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून पक्षाने नंदा म्हात्रे यांना जबाबदारी दिली आहे. गेल्या अनेक वर्ष त्यांच्या कामाची माहिती येथील नागरिकांना असल्याने त्यांना जनता भरभरून प्रतिसाद देतील.तर नंदा म्हात्रे या म्हणाल्या की पेण तालुक्यासह शहरातील गोरगरीब कष्टकरी श्रमजीवी कामगार या वर्गाला न्याय देण्याची भूमिका सातत्याने ठेवली असून त्यांच्या समस्या त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक वेळी पुढाकार घेतला आहे.त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या कामांकरीता त्यांच्या हक्काची उमेदवार असल्याने आणि काँग्रेस पक्ष नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याने आपण जनतेच्या मनातील उमेदवार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेस निरीक्षक कांबळे, तालुकाध्यक्ष अशोक मोकल, सूर्यकांत पाटील, संदीप पाटील, आर.जे.म्हात्रे, हिद्दु कुवारे तसेच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Be First to Comment