
पनवेल/प्रतिनिधी: नवीन पनवेल येथील डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांची विशेष शाळेमध्ये भाजपचे शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या मित्र परिवाराच्यावतीने विद्यार्थ्यांना बालदिनाचे औचित्य साधून खाऊ वाटप खेळणी वाटप करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापिका श्रेया जाधव, सुमित दसवते, सचिन जाचक, शेषनाथ गायकर, रवी पारचे, यज्ञेश पाटील, भावेश शिंदे, चेतन म्हसकर, संतोष वर्तले, यश, कपिल कुरघोडे हे उपस्थित होते.
केदार भगत मित्र परिवाराने विद्यार्थ्यांना आवडेल असे सजावटी चे साहित्य आणून त्यांनी या कार्यक्रमाला शोभा आणली. विद्यार्थ्यांनी पाहुण्यांची स्वागत शाळेत बनविलेला पुष्पगुच्छ देऊन केले. विद्यार्थ्यांनी पाहुण्यांसाठी स्वागत गीत सादर केले.
केदार भगत यांनी मनोगत व्यक्त करीत विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या, यापुढेही याच प्रकारे शाळेला मदत करू असे आश्वासन दिले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खेळणी वाटप करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून पॉपकॉर्न व आईस्क्रीम वाटप करण्यात आले. त्याचा मुलांनी अगदी आनंदाने आस्वाद घेतला विद्याथ्यर्थ्यांनी आलेल्या पाहण्यासोबत ग्रुप डान्स करत आनंदाने बालदिन साजरा केला. केदार भगत यांनी बालदिनाच्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना खेळणी वाटप ब खाऊ वाटप केल्याने आनंदमय वातावरणात विद्यार्थ्यांना बालदिन साजरा केला. मान्यवरांचे आभार शाळेच्या मुख्याध्यापिका श्रेया जाधव यांनी मानले.



Be First to Comment