
तृप्ती भोईर : उरण प्रतिनिधी
१४ नोव्हेंबर चाचा नेहरूंचा जन्मदिन देशभरात बालदिन म्हणून साजरा केला जातो. उरण तालुक्यातील रा. जि. प. शाळा करंजा येथे बाल दिनानिमित्त उत्कर्ष पत्रकार समितीच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले.
देशाचे पहिले माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा जन्म १४नोव्हेंबर १८८९ रोजी झाला.पंडीत नेहरूंना लहान मुलांबाबतमोठा जिव्हाळा होता, लहानमुलांमध्ये त्यांची ओळख चाचा नेहरू अशी होती या दिनाचे औचित्य साधून उत्कर्ष पत्रकार समितीच्या उरण विभाग अध्यक्षा पूजा चव्हाण, तसेच सदस्या तथा युवक आधारच्या उरण कार्यालय प्रमुख सायली साळुंके यांनी करंजा रा.जि.प.या शाळेत जाऊन लहान मुलांना खाऊचे वाटप केले व बालदिनमोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी शिक्षक वृंदानी देशभरात बालदिन का साजरा केला जातो या बाबत माहिती दिली कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनीही बालमित्रांना शुभेच्छा देत उपक्रमांचे कौतुक केले.
या शानदार कार्यक्रमात उत्कर्ष पत्रकार समितीचे अध्यक्ष पूजा चव्हाण तसेच सायली साळुंके यांनी उपस्थित बालकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले आणि त्यांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व बालकांना खाऊ वाटप करून आनंददायी वातावरण कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




Be First to Comment