

सांप्रदायाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमाला प्रोत्साहन- ज्येष्ठ कीर्तनकार तुकाराम महाराज
पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील मोठे वढाव ते आळंदी या गावातील इंचगिरी रसाळ संप्रदायाच्या पायी दिंडीला सुरूवात झाली असून या दिंडीच्या माध्यमातून वारकरी भगवंताशी एकरूप होण्याचा दृष्टिकोन ठेवत असून मोठे वढाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा कीर्तनकार कृष्णा वर्तक हे गेले अनेक वर्ष सांप्रदायाच्या माध्यमातून काम करत असताना नुकताच झालेल्या कार्तिकी एकादशीपासून आळंदी येथे पायी दिंडी सोहळा सुरू झाला आहे.त्या अनुषंगाने इंचगिरी रसाळ संप्रदायाची पायी दिंडी पेण ते आळंदी अशी पदयात्रा निघाली असून आंबेगाव येथील चित्रकुटी येथे वस्ती करून पुढे प्रस्थान झाले आहे.
या पायी दिंडी सोहळ्यात असंख्य वारकरी, महिलावर्ग सामील झाले आहेत.या दरम्यान बोलताना इंचगिरी सांप्रदायाचे राज्य उपाध्यक्ष तुकाराम महाराज म्हणाले की गेल्या अनेक वर्षापासून दिंडी सोहळे सुरू आहेत मात्र या सोहळ्यांबरोबर सांप्रदायाच्या वतीने राज्यभर अनेक सामाजिक उपक्रम राबवत असताना यामध्ये विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य, नागरिकांसाठी आरोग्य विषयक उपक्रम यास सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रम आज पर्यंत राबवत आलो असून सर्वप्रथम आम्ही सामाजिक उपक्रमाला प्रोत्साहन देत असल्याचे त्यांनी सांगितले.




Be First to Comment