
पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील जोहे येथील न्यु इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स या स्कूल मधील एका विद्यार्थ्याने शाळेत जय श्रीराम चा नारा दिल्याने तेथील मोमीन नामक शिक्षकाने त्याला मारहाण केली. सदरची माहिती विद्यार्थ्याच्या पालकासह गावातील ग्रामस्थांना मिळाली असता त्यांनी शाळेत जाऊन याबाबतची विचारणा केली त्यावेळी घाबरलेल्या मोमीन नामक शिक्षकांनी उपस्थित ग्रामस्थांची माफी मागितली.
याबाबतची सविस्तर घटना अशी की पेण तालुक्यातील जोहे येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स या स्कूलमध्ये आठवीत शिकणारा विद्यार्थी आयुष याने हायस्कूल मध्ये जय श्रीराम चा नारा दिल्याने मोमीन नामक शिक्षकाने त्याला मारहाण करीत चोप दिल्याने या घटनेविषयी पडसाद पालक, नातेवाईकांसह कळवे जोहे परिसरात उमटले दरम्यान शिक्षका विरोधात संतापाची लाट पसरल्याने घटनेच्या निषेधार्थ कळवे गावातील असंख्य नागरिकांनी जोहे हायस्कूल येथे गर्दी केली.त्यावेळी ग्रामस्थांचा रोष पाहून मोमीन नामक शिक्षकानी उपस्थित ग्रामस्थांची माफी मागितली.
सदर घटनेची माहिती दादर सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजयकुमार ब्राह्मणे यांना मिळताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन सदर प्रकरण शांत करत शिक्षकाला ताब्यात घेतले आहे.




Be First to Comment