
पनवेल शहरातील रस्त्यांवर गतिरोधक बसविण्याबाबत भाजपचे शहर उपाध्यक्ष केदार भगत यांची पालिकेकडे मागणी
पनवेल/प्रतिनिधी: पनवेल शहरातील रस्त्यांबाबत आणि काही गतिरोधक बसविण्याबाबत भाजपचे शहर उपाध्यक्ष केदार भगत यांनी पालिकेकडे पत्रव्यवहार केला असून पालिकेकडून देखील लवकरच कार्यवाही होणार असल्याचे त्यांना सांगितले आहे.
शहरातील हुतात्मा हिरवे गुरूजी मार्ग म्हणजे जुने आदर्श हॉटेल ते छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा हा मार्ग खड्डयांनी व्यापला आहे. हीच परिस्थिती कापड गल्ली, स्वामी हॉटेल ते गावदेवी मंदिर, तक्का येथील पेट्रोल पंप जवळ देखील आहे. हे सर्व रस्ते शहरातील मुख्य रस्ते आहेत खड्डयातून मार्गक्रमण करताना नागरिकांना विशेषकरून वाहनचालकांना जिकिरीचे झाले आहे. पावसामुळे काही महिने नागरिकांनी रस्त्यामुळे होणार हाल सोसले आहेत. पण आता पावसाचे प्रमाण नगण्य झाले आहे. त्यामुळे आता तातडीने नागरिकांना खड्डेमुक्त आणि धूळमुक्त रस्ते हवे आहेत. त्यामुळे याबाबत गांभीर्यपूर्वक विचार करून रस्त्यांची डागडुजी आणि शक्य असेल तिथे नवीन रस्ते करावेत.तसेच शहरातील मुख्य मार्केट (हनुमान मंदिर) ते उरण नाका रस्ता आमच्या परिसरातून जातो आणि त्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. व येथील रहिवाश्यांना त्रास होत आहे. वाहतूक कोंडी होत आहे. अनेक वाहनचालक येथे अतिवेगाने वाहने चालवतात. त्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला असून, शाळकरी मुले, वृद्ध व्यक्ती आणि पादचारी यांना रस्ता ओलांडताना अडचण निर्माण होते.
संबंधित ठिकाणी स्पीडब्रेकर (गतिरोधक) बसविण्यात यावेत अशा आशयाचे पत्र भाजपचे शहर उपाध्यक्ष केदार भगत यांनी पालिकेच्या आयुक्तांना दिले आले.




Be First to Comment