
रोटरी प्रीमियर लिगचे पनवेलच्या राजीव गांधी मैदानावर महेंद्रशेठ आणि परेश ठाकूर यांच्या हस्ते शानदार उद्घाटन
पनवेल : “पनवेल नगरीत सुंदर राजीव गांधी मैदानाची निर्मिती करण्यात आली आहे. अतिशय स्वच्छ आणि सुंदर मैदान विलोभनीय आहे. त्यासाठी रामशेठ ठाकूर यांचे योगदान मोठे आहे. क्रिकेटवर माझे विशेष प्रेम आहे. मी आजही वेळ मिळेल तसा न चुकता क्रिकेट खेळतो, ट्रेकिंग करतो. अनेक गावांना सिडकोकडून मी मैदाने मिळवून दिलीत. कुठल्याही सत्तेत नसतानाही. त्यामुळे सत्तेवर असणारी मंडळींनी किमान गावोगावी मैदाने तरी मिळवून दिली पाहिजेत, नाही तर सत्तेत बसून उपयोग काय? स्वतःवर प्रेम करा, निरोगी शरीर हीच खरी संपत्ती आहे, सर्वांशी प्रेमाने वागा, कुणाशी दुष्मणी नको, हा जन्म पुन्हा नाही, हे कायम लक्षात ठेवा,” असे मत महेंद्रशेठ घरत यांनी पनवेल येथे व्यक्त केले. टीआयपीएल रोटरी प्रीमियर लिगच्या पाचव्या पर्वाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी रोटरी प्रीमियर लिगच्या पाचव्या पर्वाचे पनवेलच्या राजीव गांधी मैदानावर आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत आणि उद्योजक परेश ठाकूर यांच्या हस्ते शानदार उद्घाटन करण्यात आले.

यावेळी टीआयपीएलचे डायरेक्टर आणि पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते, उद्योजक परेश ठाकूर, प्रीतम म्हात्रे उपस्थित होते.
यावेळी प्रीतम म्हात्रे म्हणाले, “महेंद्रशेठ घरत हे रोखठोक बोलतात, त्यांच्यात अनेक गुण आहेत. त्यामुळे त्यांचे विचार मोलाचे आहेत. ते अनुभवाचे बोल आहेत. त्यांनी अनेक गावांना मैदाने मिळवून दिलीत, हे खरोखरच अभिमास्पद आहे.”
यावेळी परेश ठाकूर म्हणाले, “पनवेल महापालिकेचे स्वतःचे मैदान आणि या मैदानावर पहिल्यांदाच रोटरीच्या क्रिकेट स्पर्धा, हा योग मला मनापासून आनंद देणारा आणि अविस्मरणीय आहे. क्रिकेट स्पर्धांसाठी मैदानातील जय्यत तयारी कौतुकास्पद आहे.”
रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे सहा ओनर, सहा टिम आणि प्रत्येकी 14 खेळाडू आहेत. ही स्पर्धा ७ ते ९ आणि १४ ते १६ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे.
रायगड वारियर्सचे अध्यक्ष गणेश कडू, सचिव डॉ. संतोष जाधव, खजिनदार आशीष थोरात यांच्या पुढाकाराने स्पर्धा सुरू आहेत. तसेच पंकज पाटील, सिकंदर पाटील, सतीश देवकर, देवेंद्र चौधरी यांची स्पर्धा आयोजित करण्यात मोलाची भूमिका आहे.




Be First to Comment