
आनंदमठ’, ‘वंदे मातरम’ आणि पनवेलचे भूमिपुत्र आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके
राजेश गायकर : कामोठे, पनवेल
बंकिमचंद्र चटर्जी यांनी ‘आनंदमठ’ कादंबरी (प्रकाशन वर्ष १८८२) मध्ये ज्या घटनांचे आणि संन्याशांच्या उठावाचे वर्णन केले आहे, त्यातील प्रसंग थेटपणे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनावर (त्यांचे बंड १८७९ मध्ये झाले) आधारित आहेत.
‘आनंदमठ’मधील कथा १७७० च्या दशकातील बंगालमधील ‘संन्यासी विद्रोह’ (Sanyasi Rebellion) आणि बंगाल मधील मोठ्या दुष्काळावर (Great Bengal Famine) आधारित असल्याचे बंगाली साहित्यात सांगितले जाते. यात संन्यासी आणि फकीर यांनी स्थानिक जमीनदार व ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या धोरणांविरुद्ध सशस्त्र लढा दिला होता.
बंकिमचंद्र यांनी या ऐतिहासिक विद्रोहाचा आधार घेऊन, त्याला ‘वंदे मातरम’ ( Rebellion Cry ) या राष्ट्रभक्तीच्या विचारांची जोड दिली आणि ‘मातृभूमीची सेवा’ हाच धर्म मानणाऱ्या संन्यासी-योद्धांचे (संतती दल) चित्रण केले.मात्र आद्य क्रांतिकारी फडके यांचे बंड १८७९ मध्ये झाले, त्यांनी आदिवासी व स्थानिक तरुणांची ‘राम मावळे’ असे सैन्य तयार केले. आणि ब्रिटिशांविरुद्ध भारतात पहिला सशस्त्र लढा दिला. पुढे बकीमचंद्रांनी ‘आनंदमठ’ १८८२ मध्ये प्रकाशित झाली. तोपर्यंत आद्यक्रतिकारी फडके यांच्या बंडखोरीची बातमी बंगालपर्यंत पोहोचली होती.
बंकिमचंद्रांनी कादंबरी लिहिताना फडके यांच्या जीवनातील घटनांवर थेट आधार घेतल्याचा अनेक अभ्यासकांचे भाष्य आहे.दोन्ही ठिकाणी (कादंबरीत आणि आद्य क्रांतिकारकांरी फडके यांच्या जीवनात) सामान्य नागरिकांनी संघटित होऊन, अत्याचारी सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव केला आणि त्यासाठी त्याग व समर्पण केले.अनेक मराठी इतिहासकार, तसेच वि.दा. सावरकर आणि ना. गो. चापेकर यांच्यासारख्या लेखकांनी फडके यांच्या शौर्याचा गौरव करताना त्यांचा उल्लेख ‘आनंदमठ’मधील संन्याशांशी तुलनात्मक किंवा प्रेरणादायी म्हणून केला आहे.
अर्थात ‘रिबेल क्राय’ म्हणून व उल्लेख असलेले वंदे मातरम हे क्रांतीगीत ( आज 150 वा वर्धापन दिन ) ज्या प्रेरणादायी कादंबरी मधून राष्ट्राला मिळाले, त्या कादंबरीचा नायक आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके ( परवा ४ नोव्हेंबर जयंती झाली ) हे पनवेलमधील शिरढोण गावचे भूमिपुत्र होते याचा आम्हा पनवेलकरांना निश्चित अभिमान आहे आणि राहील.




Be First to Comment