
दीपक फर्टीलायझर्स यांच्या वतीने त्वचा विकार उपचार शिबिराचे आयोजन
पनवेल/ प्रतिनिधी
तालुक्यातील ढोंगऱ्याचा पाडा येथे ६ नोव्हेंबर रोजी दीपक फर्टीलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यावतीने विनामूल्य त्वचा विकार उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिर ईशान्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. दीपक फर्टीलायझर्स यांच्या वतीने चालू वर्षातील हे चौथे त्वचा विकार उपचार शिबिर असून याद्वारे ५३० पेक्षा जास्त रुग्णांनी याचा लाभ घेतला.

दीपक सरटीलायझर्सचे जनरल मॅनेजर योगेश बोधे यांच्या शुभहस्ते शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी देवीच्या पाड्याचे माजी सरपंच गोमा म्हात्रे, मेडिकल ऑफिसर मिलिंद कुमार झोडगे आणि सुप्रसिद्ध त्वचा विकार तज्ञ डॉक्टर लीला बोस यांची प्रमुख उपस्थिती होती. दीपक फर्टीलायझर्स यांच्या सौजन्याने (सी एस आर फंडातून) आतापर्यंत पाच शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले असून पाले, देवीचा पाडा,ढोंगऱ्याचा पाडा, पाले खुर्द, खैरणे, तोंडरे,पडघे,कानपोली, वलप आणि आजूबाजूच्या गावातील साडेपाचशे पेक्षा जास्त रुग्णांना याचा फायदा झालेला आहे.
त्वचा विकार उपचार शिबिरांमुळे येथील नागरिक व्याधीमुक्त जीवन जगत आहेत. विशेषतः स्त्रिया तसेच मुलांमध्ये त्वचा विकाराचे प्रमाण अधिक प्रमाणात आढळून येते. अरे कुटुंबांना महागडे उपचार परवडत नाहीत, त्यामुळे त्वचा विकार उपचाराविना सहन केले जातात अशी माहिती सी एस आर विभागाचे असिस्टंट जनरल मॅनेजर संदीप काकडे आणि ईशान्य फाउंडेशन चे प्रोजेक्ट ऑफिसर योगेश पाटील यांनी दिली. ही त्वचा विकार उपचार शिबिरे यशस्वी करण्यासाठी डॉक्टर सोनाली शेळके आणि डॉक्टर तेजसी सोनजे यांनी अथक परिश्रम घेतले.




Be First to Comment