
लोकनेते दि बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ: ‘कनेक्टिव्हिटी’चे नवे मॉडेल
पनवेल : राजेश गायकर
मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) वाहतुकीची जीवनरेखा बनण्याच्या तयारीत असलेल्या लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Navi Mumbai International Airport – NMIA) नुकतेच (८ ऑक्टोबर २०२५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिमाखदार उद्घाटन झाले आहे. १,१६० हेक्टर क्षेत्रावर साकारलेला हा प्रकल्प केवळ एक विमानतळ नाही, तर तो देशातील विमानतळ बांधणीच्या भविष्याचे एक अत्याधुनिक मॉडेल आहे.
NMIA ची रचना आणि क्षमता जितकी प्रभावी आहे, तितकीच त्याची कनेक्टिव्हिटी (वाहतूक जोडणी) हा एक गेम चेंजर ठरणार आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईला अभूतपूर्व वेगाने जोडणाऱ्या बहु-मॉडेल (Multi-Modal) नेटवर्कमुळे हे विमानतळ संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी हवाई प्रवासाचे प्रमुख केंद्र बनेल.
१. NMIA ची वैशिष्ट्ये आणि क्षमता
,वैशिष्ट्य आणि तपशील
नाव : लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA)
प्रवासी क्षमता : पहिल्या टप्प्यात २० दशलक्ष (२ कोटी) वार्षिक प्रवासी. अंतिम टप्प्यात ९० दशलक्ष (९ कोटी) प्रवासी.
रचना : कमळाच्या संकल्पनेवर आधारित, लंडनस्थित ‘झाहा हदीद आर्किटेक्ट्स’ (Zaha Hadid Architects) यांची डिझाइन.
तंत्रज्ञान : भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल आणि AI-सक्षम (Artificial Intelligence) विमानतळ.
ऑपरेशनल क्षमता : दोन समांतर धावपट्ट्या आणि चार टर्मिनल्स (पैकी सध्या एक कार्यान्वित होतंय).
२. NMIA: त्रि-आयामी कनेक्टिव्हिटीचा महामार्ग
या विमानतळाला मुंबई महानगर प्रदेशाच्या (MMR) प्रत्येक कोपऱ्याशी जोडण्यासाठी एक अखंड मल्टी-मॉडेल ट्रान्सपोर्ट नेटवर्क विकसित केले जात आहे. या नेटवर्कमध्ये रस्ते, रेल्वे/मेट्रो आणि जलवाहतूक या तिन्ही माध्यमांचा समावेश आहे.
कनेक्टिव्हिटीचा मार्ग, प्रमुख प्रकल्प,जोडणी आणि फायदा
रस्ते (Road) : १. अटल सेतू (MTHL): मुंबई ट्रान्स हार्बर लिंक. २. उलवे कोस्टल रोड. ३. प्रस्तावित ठाणे-NMIA उन्नत मार्ग.
सर्वात मोठा गेम चेंजर: मुंबईहून विमानतळाचा पर्यंतचा प्रवास वेळ २०-२५ मिनिटांपर्यंत कमी झाला आहे. प्रवाशांना थेट, सिग्नल-मुक्त रस्ते कनेक्टिव्हिटी मिळेल.
मेट्रो/रेल्वे :
दोन विमानतळ जोडणी: मुंबई आणि नवी मुंबई ही दोन्ही विमानतळे मेट्रोद्वारे थेट जोडली जातील. यामुळे प्रवाशांना दोन्ही शहरांमध्ये सहज ये-जा करता येईल.
जलमार्ग (Water Taxi): वॉटर टॅक्सीने जोडले जाणारे भारतातील पहिले विमानतळ असेल. यामुळे गेटवे ऑफ इंडिया किंवा भाऊचा धक्का (Ferry Wharf) येथून विमानतळा पर्यंत जलद आणि आरामदायी प्रवास शक्य होईल.
इंट्रा-टर्मिनल स्वयंचलित भूमिगत ट्रेन (APM) : विमानतळ परिसरातील चारही टर्मिनल्स एकमेकांशी जोडण्यासाठी ही ड्रायव्हरलेस ट्रेन वापरली जाईल, ज्यामुळे प्रवाशांना टर्मिनल्स बदलणे सोपे होईल.
व्यावसायिक उड्डाणांना विलंब का? हा प्रश्न सर्वांच्या मनात आज आहे.
विमानतळाचे उद्घाटन झाले असले तरी, व्यावसायिक उड्डाणे सुरू होण्यासाठी डिसेंबर २०२५ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. यामागील मुख्य कारणे ही तांत्रिक आणि सुरक्षा मानकांशी संबंधित आहेत:
- रनवे कमिशनिंग: धावपट्टी, आपत्कालीन प्रतिसाद सेवा आणि नेव्हिगेशन सिस्टीम्स पूर्ण क्षमतेने कार्यान्वित (commission) होण्यासाठी DGCA (नागरी विमान वाहतूक महासंचालनालय) ची अंतिम तपासणी आणि प्रमाणित करणे आवश्यक आहे.
- एअरोनॉटिकल अडथळे: विमानतळाच्या सुरक्षित ऑपरेशनसाठी आवश्यक असलेल्या हवाई मार्गात (Flight Path) अडथळा आणणारे जवळपास २२५ अडथळे (इमारती, टॉवर्स, टेकड्या) दूर करण्याची किंवा त्यांचे व्यवस्थापन करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे.
४. NMIA: पुढील आर्थिक विकासाची गुरुकिल्ली
NMIA च्या माध्यमातून रायगड, ठाणे, कोकण आणि पुणे पट्ट्यातून येणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. याशिवाय, उलवे, पनवेल, खारघरमध्ये विकसित होणारे व्यावसायिक प्रकल्प, लॉजिस्टिक्स हब आणि गृहनिर्माण प्रकल्प यामुळे लाखो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. हे विमानतळ केवळ एक ट्रान्सपोर्ट हब नसून, ते संपूर्ण MMR च्या पुढील ५० वर्षांच्या आर्थिक विकासाची गुरुकिल्ली ठरणार आहे.




Be First to Comment