
पेण नपा.निवडणुकीत आम्ही पेणकर विकास आघाडीचे दहा उमेदवार जाहिर
पेण, ता. ५ (वार्ताहर) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होताच पेण नगरपालिका निवडणुकीमध्ये माजी नगराध्यक्ष शिशीर धारकर यांनी स्थापन केलेल्या आम्ही पेणकर विकास आघाडीच्या दहा उमेदवारांची पहिली यादी उशिराने जाहीर झाली आहे.पेण नगरपालिका निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडी तसेच आम्ही पेणकर विकास आघाडी रिंगणात उतरल्याने या निवडणुकीला रंगत येणार असल्याचे चित्र दिसत आहे.
यावेळी पेण नगरपालिकेमध्ये २४ उमेदवार निवडून जाणार असून आम्ही पेणकर विकास आघाडीचे पहिल्या दहा यादीमधील उमेदवार प्रभाग क्रमांक १ ब- राकेश विलास पाटील, प्रभाग २ ब- प्रवीण शंकर पाटील, प्रभाग ४ अ- विनिता प्रवीण पाटील, प्रभाग ५- सुजाता सतिश समेळ, प्रभाग ६ अ- छाया सुनील काईनकर, ब- संदीप तुकाराम सुर्वे, प्रभाग ७ ब- कृष्णा (सद्दाम) जनार्दन भोईर, प्रभाग ८ अ- मीनल पांडुरंग पाटील, ब- विजय कृष्णा आवास्कर, प्रभाग क्रमांक १० ब- संकेत (दादू) विश्वनाथ म्हात्रे अशा एकूण दहा उमेदवारांची पहिली यादी आम्ही पेणकर विकास आघाडीने उशिराने जाहीर केले असून उर्वरित उमेदवारांची यादी लवकरच आम्ही पेणकर विकास आघाडीचे सर्वेसर्वा माजी नगराध्यक्ष शिशीर धारकर जाहीर करणार असल्याचे आघाडीचे सचिव प्रदीप मोने यांनी सांगितले आहे.




Be First to Comment