

तुम्ही वेळ आणि साथ द्या, मी तुम्हाला न्याय मिळवून देईन ; फेडरेशनचे अध्यक्ष मल्लिनाथ गायकवाड यांची ग्वाही
नवीन पनवेल : प्रतिनिधी
सिडको महामंडळाने बंगलो टाईप भूखंडावर उभ्या इमारतीना अनियमित ठरवून त्या नियमित करण्यासाठी नुकतीच एक अभय योजना राबविली त्यात रहिवाशांची काहीही चूक नसतांना लाखों रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद केली होती त्याला पनवेल उरण तालुका हौसिंग फेडरेशनने विरोध करीत नविन पनवेल येथील डी. ए. व्ही. पब्लिक स्कूलमध्ये जनजागृती मेळावा घेऊन या प्रकारात बाधित जनतेला जागृत करून या अभय योजनेला व त्यातील दंडाच्या तरतुदीला विरोध दर्शवीला होता. फेडरेशन चे अध्यक्ष मल्लिनाथ गायकवाड यांनी तुम्ही मला वेळ व साथ द्या, मी तुम्हाला न्याय मिळवून देईन अशी ग्वाही दिली, तेंव्हा सर्व उपस्थितांनी वज्रमुठ बांधून तुम्ही घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य असेल असे सांगितले.
या प्रसंगी अडव्होकेट प्रताप पाटील, अडव्होकेट शारदा पिंजारी, पुनरविकास क्षेत्रातील तज्ञ सल्लागार श्री पर्वते व श्री सचिन गायकवाड यांनी समयोचित मार्गदर्शन केले. शेवटी नविन पनवेल येथील सिडको कार्यालयावर बुधवारी दि. 12 नोव्हेंबर रोजी निर्धार मोर्चा काढण्याचा निर्णय झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्वरी गायकवाड यांनी केले शेवटी बाबासाहेब पाटील यांनी आभार मानले.




Be First to Comment