
पनवेल दि.०३(वार्ताहर): नवीन पनवेल सेक्टर 15a,भुजबळवाडी,येथे तुलसी विवाह निमित्त संपूर्ण भुजबळ कुटुंबीय आणि तेथील रहिवासी यांनी एकत्र येऊन सामुदायिक तुळशी विवाह संपन्न केला.यावेळी मोठ्या संख्येने स्त्री-पुरुष, भुजबळ कुटुंबीय त्याचबरोबर बच्चे कंपनी हजर होते.
यावेळी माजी नगरसेवक एडवोकेट मनोज भुजबळ, माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, तेजस भुजबळ, हेमंत भुजबळ, ऍड. अमित भुजबळ, ऍड . संकेत भुजबळ एड.मधुरा भुजबळ, ऍड. प्रियांका भुजबळ, ऍड. अंजली भुजबळ ऍड. प्रशांत भुजबळ, ऍड. सुरेखा भुजबळ, उद्योगपती शेखर भुजबळ, संतोष भुजबळ, उत्कर्ष सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राकेशजी भुजबळ, अनंत जाधव, प्रमोद भुजबळ, गोविंद भाई राजपुरोहित याची उपस्थिती लाभले. सदैव विवाह सोहळा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला, भुजबळवाडी मधील सर्व रहिवासी एकत्र येऊन प्रत्येक सण उत्साहाने साजरा करत असतात त्याबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.





Be First to Comment