Press "Enter" to skip to content

खाडीपट्टयात दूध कलेक्शन सेंटरचा शुभारंभ सोहळा उत्साहात

सी एस धोंडगे ऍग्रो डेअरी फार्मचा शेतकऱ्यांसाठी स्तुत्य उपक्रम

कोकणातील लोप पावत चाललेले वैभव पुन्हा उभे राहील ; वाशिष्ठी डेअरी संस्थापक यादव यांचे प्रतिपादन

महाड : रघुनाथ भागवत

शेतीला पूरक असणाऱ्या दुग्ध व्यवसायाची सी एस धोंडगे ऍग्रो डेअरी फार्मच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महाड तालुक्यातील हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून त्याची दिवसेंदिवस होणारी वृद्धी कोकणातील लोप पावत चाललेले वैभव पुन्हा उभे राहत असल्याचे प्रतिपादन शनिवारी पार पडलेल्या चोचिंदे येथील दूध कलेक्शन सेंटरच्या खडीपट्टयातील दुसऱ्या वास्तूचा शुभारंभ सोहळ्याप्रसंगी वाशिष्टी डेअरीचे संस्थापक प्रशांत यादव यांनी केले.

दूध कलेक्शन सेंटर या वस्तूचा शुभारंभ सोहळा वाशिष्टी डेअरी संस्थापक प्रशांत यादव यांच्या हस्ते पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी वाशिष्टी डेअरी मुख्य कार्यवाहक साधना यादव, संचालक महेश खेतले, मॅनेजर प्रदीप मगदूम, हर्षद चाळके, सीएस धोंडगे ऍग्रो डेअरी फार्म संस्थापक चंद्रकांत धोंडगे, संचालक सुरेश धोंडगे, संतोष फाटक, पशुवैद्यकीय अधिकारी सोनाली अहिरे, दै.पुढारी पत्रकार रघुनाथ भागवत आदी मान्यवरांसह चिंभावे माजी उपसरपंच गणपत मालप, सदस्य नितीन कदम, गणेश कुर्डूनकर, अंकुश नवले, जया निवाते, राज राणे, संदीप राणे, रमेश धाडसे, जितेंद्र शिंदे, दत्ताराम भावे, संजय जंगम, एकनाथ नवले, बाळकृष्ण खोपकर, आरिफ कादिर, अशोक पाटील, प्रदीप कदम, उतेकर यांच्यासह विभागातील दुग्ध व्यवसाय शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खाडीपट्टयातील उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना यादव पुढे म्हणाले की, आपल्या सर्व शेतकऱ्यांना अनेक अडीअडचणींशी सामना करावा लागत आहे, या सर्वांवर मात करून आपल्याला प्रगती गाठायची आहे. आपली ही डेअरी सातत्याने हमीभावापेक्षा जास्त भाव देत आहे. डेअरी चालवणे हा व्यवसाय नसून ती एक सेवा आहे आणि गेली दोन वर्षांमध्ये डेअरीवर येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढल्याने हा प्रकल्प जरी नवीन असला तरी तोट्यात गेलेला नाही, तर त्याची दिवसेंदिवस वृद्धी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता आपण जनावरांची संख्या वाढवावी त्यांच्या चारा, प्रतिकारशक्ती, वैद्यकीय उपचार या संदर्भात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने काळजी घेऊ. आपण दुधाची गुणवत्ता आणि फॅट वाढवण्यासाठी संतुलित आहार, जनावरांची स्वच्छता आणि जनावरांना पौष्टिक चारा द्यावा, त्यात योग्य प्रमाणात पशुखाद्य देण्यासाठी प्रयत्न करावेत यापुढे आता सीएस धोंडगे ऍग्रो डेअरी फार्मचे संस्थापक चंद्रकांत धोंडगे यांनी डेअरी वाढवाव्यात आणि म्हशींची संख्या देखील वाढवून महाराष्ट्रातून दुधाची मागणी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

दरम्यान, चंद्रकांत धोंडगे यांनी आपल्या मनोगतामध्ये भागातील सर्व शेतकऱ्यांनी कशाप्रकारे सहकार्य केले आणि सुरुवातीला चार-पाच असणाऱ्या शेतकऱ्यांची आता संख्या पन्नासच्या वर पोहचली आहे तसेच दोन वर्षांमध्ये दुसरी डेअरी या विभागामध्ये काढण्याचे मी धाडस केले आहे ते केवळ माझ्या सहकारी शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळेच असे सांगून उपस्थित शेतकऱ्यांचे आभार मानले. छोटेखानी झालेल्या या कार्यक्रमाची प्रस्तावना गणेश कुर्डूनकर यांनी, तर सूत्रसंचालन गणपत मालप यांनी सुंदरप्रकारे केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.