
पनवेल दि. ०१ ( वार्ताहर ) : पनवेल जवळील शीव – पनवेल महामार्गावरील कळंबोली सर्कल (मॅकडॉनल्ड हॉटेलसमोर) येथे उभ्या राहणाऱ्या खासगी आणि राज्य परिवहन महामंडळाच्या बसमुळे निर्माण होणाऱ्या वाहन कोंडीने हैराण प्रवाशांना आता दिलासा मिळणार आहे.
मॅकडॉनल्डसमोरील खासगी बस थांबा कामोठे उड्डाण पुलाजवळ के.एल.ई. महाविद्यालयासमोर स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन महिन्यांच्या बैठक सत्रांनंतर हा निर्णय घेण्यात आला असून १ नोव्हेंबर २०२५ पासून नवीन बसथांबा कार्यान्वित होणार आहे. नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय भोसले यांनी हा निर्णय घेतला आहे.
नवीन बसथांब्याची शिस्त राखण्यासाठी वाहतूक विभाग दोन स्वयंसेवक नेमणार आहेत. मुंबई बस मालक संघटनेलाही यासंबंधी सूचना दिल्या आहेत. बस चालकांनी नवीन ठिकाणीच थांबणे, हॉर्नचा गैरवापर न करणे आणि प्रवासी घेतल्यानंतर तात्काळ पुढे निघणे या अटींचे पालन रावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. कळंबोली कॉलनीजवळ पुन्हा बस थांबविल्यास कारवाई केली जाईल. असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.




Be First to Comment