
पनवेल दि. ०१ ( वार्ताहर ) : पैशाच्या वादातून नाभिकाने एका ग्राहकावर वस्ताऱ्याने गंभीर वार केल्याची घटना नवीन पनवेल येथे घडली आहे .
नवीन पनवेल येथील मंगलमूर्ती मार्केट या ठिकाणी असलेल्या दीपक हेअर कटिंग सलून येथे रवींद्र कल्लाप्पा वाघमारे (वय ३५ वर्षे धंदा ड्रायव्हर) हा केस कटिंग करण्यासाठी गेला असता येथील कामगार सीठा रघुवीर सिंग (वय २९ वर्ष राहणार देवद ) याच्याकडे फिर्यादी रवींद्र वाघमारे केस कापण्यासाठी गेला असता सिठा रघुवीर सिंग याने ‘आदी प्रथम पैसे दे मग तुझे केस कापतो’ असे बोलले असता त्या कारणावरून फिर्यादी रविंद्र व आरोपी सिठा सिंग वाद होऊन त्यातील आरोपी याने त्याच्या हातातील दाढी करण्याच्या वस्तऱ्याने फिर्यादी याच्या उजव्या डोळ्याच्या खालील बाजूपासून उजव्या गालावर ओठापर्यंत वार करून गंभीर दुखापत केली. रवींद्र वाघमारे याला एमजीएम हॉस्पिटल येथे उपचारासाठी ठेवले असून सदर प्रकरणाचा तपास खदिश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय परशकर करत आहेत.
या घटनेतील आरोपी सिठा सिंग याला अटक केली असून दीपक हेअर कटिंग सलून मंगलमूर्ती मार्केट नवीन पनवेल हे दुकान तपासासाठी सेल केले आहे या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक संजय पारसकर करत आहेत.





Be First to Comment