Press "Enter" to skip to content

अनुष्का भारत मोरे ची बॉडी बिल्डिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई

तृप्ती भोईर : उरण

बॉडी बिल्डिंग हा एक क्रीडा प्रकार आहे याला” बॉडी बिल्डिंग” अथवा “शरीर बांधणी” असे म्हणतात. यात मुख्यत्वे शरीराला व्यायाम देऊन शरीराच्या स्नायूंना बळकट केले जाते स्नायूंचा आकार व त्यांची सुडौलता व प्रमाणबद्धता याचे सादरीकरण हे या क्रीडा प्रकाराचे महत्त्व आहे. चौरस आहार हा क्रीडापटूंच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे मग ते बॉडी बिल्डिंग असो किंवा अजून कुठलाही क्रीडा प्रकार आहारावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे .आहार नियंत्रित असेल तर कोणताही आहार घेतला तरी शरीर सौष्ठव बनवू शकता. कठोर मेहनतीच्या जोरावर प्रगती अवलंबून असते जिद्द आणि चिकाटी डोळ्यासमोर ठेवल्यास मार्गात अडथळा येऊ शकत नाही .कठोर मेहनतीच्या जोरावर सौष्ठवांची प्रगती ही अवलंबून असते शरीर सौष्ठव आणि शिस्त योग्य आहार, वेळ व्यवस्थापन, परिश्रम आणि जिद्द या गुणांचा योग्य वापर केल्यास भविष्यात खेळाडू उत्कृष्ट सौष्ठवपट्टू खेळाडू बनू शकतो.

अनुष्का भारत मोरे ही डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी ऑफ हॉस्पिटॅलिटी या संस्थेची विद्यार्थिनी डिप्लोमा इन बेकिंगचं शिक्षण घेत आहे. बॉडी बिल्डिंग या खेळात आतापर्यंत तिने अनेक वेळा आपली चमक दाखवली नॅशनल फिजिक कमिटी गोवा येथे २०२३ मध्ये बॉडी बिल्डिंग वुमन्स बिकिनी कॅटेगिरी मध्ये तिने रौप्य पदक पटकावले होते.
अनुष्काला आपल्या कुटुंबातून तिचे वडील भारत मोरे ,आई व मोठी बहिन अंजली मोरे हे तिला खेळासाठी नेहमीच प्रोत्साहित करत आहेत. आणि तिला आवड असलेल्या या खेळात ते सहकार्य करत आहेत त्यामुळे ती या खेळात आपले वर्चस्व सिद्ध करत आहे.

अनुष्काची या खेळातील गगन भरारी दिवसेंदिवस प्रगतीपथावर आहे दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ रोजी एन.पी. सी. वर्ल्ड वाईड इंडिया बॉडी बिल्डिंग आणि फिजिक चॅम्पियनशिप जयपूर येथे घेण्यात आलेल्या वुमन्स फिट मॉडेल ओपन या स्पर्धा प्रकारात अनुष्का मोरे हिला प्रथम क्रमांक मिळाला आहे आणि ती सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे. त्याचप्रमाणे वुमेन्स बिकिनी मध्ये तिला रौप्य पदक मिळाले आहे.
अनुष्का मोरे हिने वुमेन्स फिट मॉडेल ओपन या कॅटेगरीत मिळवलेल्या सुवर्ण पदकाच्या चमकदार कामगिरी बद्दल नगरसेवक बबन मुकादम युथ क्लब कळंबोली यांनी दखल घेऊन त्यांनी अनुष्का चा सत्कार करून तिला शुभेच्छा दिल्या.

तिच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे व तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याचप्रमाणे तिला भविष्यात पुढे होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा देत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.