Press "Enter" to skip to content

छटपूजेसाठी मोतीराम तलाव येथे अनधिकृत चौथरे बांधणी

मनसेच्या अल्टिमेटम नंतर नगरपालिकेकडून चौथरे जमीनदोस्त

पेण, ता. ३१ (वार्ताहर) : देशातील उत्तर भारतीयांचा छटपूजा हा सण सर्वात मोठा मानला जात असल्याने या सणानिमित्त पेण शहरातील मोतीराम तलाव येथे उत्तर भारतीयांनी अनधिकृतपणे चौथरे बांधून तीथे छटपूजा केली याबाबत मनसेने आवाज उठविले असता पेण नगरपालिका प्रशासनाने २४ तासांच्या आतच सदरचे अनधिकृत चौथरे जमीनदोस्त केले आहेत.मागच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या छटपूजेनिमित्त पेण शहरातील उत्तर भारतीयांकडून नगरपालिका हद्दीत असणाऱ्या पर्यटन स्थळातील मोतीराम तलाव येथे छटपूजानिमित्त तेथे अनधिकृतपणे चौथरे बांधण्यात आले होते. याबाबतची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळाली असता सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पेण नगरपालिकेला अशा अनधिकृत चौथाऱ्यांना परवानगी न देता तात्काळ जमीनदोस्त करण्यात यावे याबाबतचा अल्टिमेट त्यांनी दि. ३० रोजी दिला होता.त्या अनुषंगाने पेण नगरपालिका प्रशासन यांनी दखल घेत उत्तर भारतीय यांनी उभारलेल्या अनधिकृत छटपूजाच्या चौथऱ्यांवर अखेर बुलडोजर फिरवून जमीनदोस्त केले आहे.

पेण शहरातील मोतीराम तलाव या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी उत्तर भारतीयांनी छटपूजेकरीता चौथर्‍याची उभारणी केली होती हे अनधिकृत असून उत्तर भारतीयांनी आपापले सण साजरी करावे याबाबत आमचे दुमत नाही आहे.परंतु शहरात अनधिकृतपणे असे चौथरे उभे राहत असतील तर त्या मुजोरीला मनसे खपवून घेणार नाही महाराष्ट्राच्या जनतेसाठी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही कदापिही ते सहन करणार नाहीत.याचा आवाज उठवला असता नगरपालिका प्रशासनाने तात्काळ त्याची दखल घेतल्याने त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.

संदीप ठाकूर- जिल्हा उपाध्यक्ष मनसे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.