Press "Enter" to skip to content

महानगर पालिका आयुक्तांना दिले निवेदन

नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी

पनवेल दि.३१(वार्ताहर): नविन पनवेल हे पनवेल रेल्वे स्टेशनला लागूनच वसलेले असल्याने आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागात नव्याने मोठ मोठे गृहसंकुल उभे राहिल्याने व भविष्यात नैना अंतर्गत सुध्दा प्रचंड मोठ्या प्रमाणावर गृहसंकुल व व्यापारी संकुल, शाळा, कॉलेज, त्याचप्रमाणे वेगवेगळी सरकारी कार्यालय उभी राहणार आहेत. नविन पनवेल मधील रस्ते हे सिडकने कोणतेही भविष्यातील रहदारी, पार्किंगचा विचार न करताच अरुंद स्वरुपाचे ठेवलेले आहेत. त्यातच आजूबाजूच्या ग्रामीण भागातील उभारलेल्या संकुलांतील रहिवाशी हे हया अरुंद रस्त्यावरच आपली दुचाकी वाहणे व चारचाकी वाहणे उभी करुन रेल्वेने प्रवास करतात, अर्थात यामुळे नविन पनवेल मधील रहिवाशांना प्रचंड ट्रॅफीकचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नविन पनवेल मधील नव्याने पुर्नबांधणी होत असलेल्या इमारतींमध्ये पुरेशी पार्किंग ठेवणे, जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवूनच इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मागणी मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांनी आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनाही निवेदनाची प्रत देण्यात आली आहे. या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे की, नविन पनवेल मधील सिकेटी शाळे समोरील रस्त्यामधील गटार / फूटपाथ याची रुंदी कमी करुन रस्त्याची रुंदी वाढविणे, सदर रस्त्याच्या दोन्ही बाजूने पार्किंग कमीत कमी 2-2 मीटर रस्त्यांची रुंदी दोन्ही बाजूने वाढवून त्याचा वाढीव एफ.एस.आय. सदर विकसित होणाऱ्या बिल्डींग / सोसायट्यां द्यावा व रस्ता रुंद करावा, तसेच नविन पनवेल मधील सर्व अंतर्गत छोटया रस्त्यांची रुंदी रस्त्यांच्या दोन्ही बाजूने 1-1 मीटर रस्त्यांची रुंदी वाढवून त्याचा वाढीव एफ.एस.आय. त्या बांधील इमारतींना दयावा. जेणेकरुन रहिवासीयांचे नुकसान होणार नाही, ह्या पुनर्विकसित होणाऱ्या इमारतीमध्ये दुपटीने रहिवासी / वाणिज्य गाळेधारक रहावयास अथवा / व्यापारी म्हणून येणार आहेत. त्यामुळे मुळतः सदर इमारतीमधील लोकांना पुरेशी पार्किंग मिळणार आहे का? याची खात्री करुन प्रत्येक इमारतीला स्वतःची पुर्ण वाणिज्य व सदनिका यांना पार्किंगची सोय झालीच पाहिजे अन्यथा पुन्हा पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर येवून स्टेशन रोड अथवा आजूबाजूच्या रहिवासियांना राहणे / जगणे मुश्किल होईल, बरेच बिल्डर हे ओ.सी. मिळविण्यासाठी 2 ते 3 महिन्यासाठी भाडयाने पार्किंगची (मेकॅनिकल पार्किंग) सोय करुन नंतर ओ.सी. मिळाल्यावर ती पार्किंग काढून टाकतात व पनवेल महानगरपालिका किंवा सिडको यांची फसवणूक करतात.

याबाबत पनवेल महानगरपालिकेने दक्ष रहावे असे अधोरेखित केले आहे. तसेच या विषयाबाबत त्वरित कार्यवाही करुन नविन पनवेल पूर्व व पश्चिम येथील रहिवासियांना लवकरात लवकर न्याय द्यावा व त्या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर तसेच सभागृह नेते परेशशेठ ठाकूर यांच्यासह त्वरीत बैठक घेवून मार्ग काढावा अन्यथा आम्हाला नागरीक म्हणून वेगळे आंदोलन छेडावे लागेल असा इशारा दिला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.