
तृप्ती भोईर : उरण
उरण तालुक्यातील दिघोडे गावची सुवर्ण कन्या अवनी अलंकार कोळी बंदुकीची मक्तेदारी पुरुषांची हा समज मागे टाकून अवनीचे वडील अलंकार कोळी तिचे कुटुंब व दिघोडे गावचे ग्रामस्थ,तीचे प्रशिक्षक, मार्गदर्शक, नेहमीच तीला नेमबाजी च्या क्षेत्रात तीला प्रोत्साहन देणारे , नेमबाजी हा सामान्य माणसाच्या खिशाला न परवडणारा खेळ पण अवनी ची जिद्द चिकाटी च्या जोरावर ती सातत्याने या खेळात आपले भरिव योगदान देत आहे.आणि या खेळात आपले वर्चस्व सिद्ध करित आहे. वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी तीने पिस्तूल शुटिंग ची सुरुवात केली आणि तेव्हापासून तीने मागे वळून पाहिले नाही.
अवनी ने आतापर्यंत अनेक स्पर्धांमधून गोल्ड, सिल्वर ,ब्रांझ पदक पटकावले आहेत. आणि आता ४०सा वी महाराष्ट्र रायफल शॉर्टगन शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा २०२५ समीर पाटील शूटिंग स्पोर्ट्स अकॅडमी पालघर येथे दिनांक २१ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर २०२५ दरम्यान आयोजित केलेल्या स्पर्धेत सिद्धांत रायफल शूटिंग क्लब रायगडची कु.अवनी अलंकार कोळी हिने रायगड जिल्ह्याचे नेतृत्व करत ज्युनिअर वूमन डबल ट्रॅप शॉटगन स्पर्धेत सुवर्णपदक व ट्रॅप शूटिंग मध्ये ज्युनिअर वूमन ट्रॅप शुटिंग मध्ये कांस्यपदक मिळवले आहे .
तिची झुंजार खेळी आणि नेत्र दीपक यशाचे क्लबचे अध्यक्ष विजय खारकर ,रायगड भूषण राष्ट्रीय नेमबाज सेक्रेटरी किशन खारके, प्रीतम पाटील, महेश फुलोरे ,अजिंक्य चौधरी, समाधान घोपरकर प्रकाश दिसले, अविनाश भगत, सुरज थळे, राजू मुंबईकर,वीर वाजेकर महाविद्यालय फुंडे चे प्राचार्य ठक्कर सर,अलंकार कोळी तिचे प्रशिक्षक रालस्टोन कोयलो,आय. एस. एस. एफ. सर्टिफाय बी कोच यांनी अभिनंदन करून तिला पुढील राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तिच्या या दैदिप्यमान कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.





Be First to Comment