Press "Enter" to skip to content

करंजाडे पाणीप्रश्नावर शिवसेनेचा मोठा लढा

सेक्टर ५, ५A, ६ साठी स्वतंत्र ‘Underground GSR’ ची सिडकोकडे मागणी

करंजाडे : प्रतिनिधी

करंजाडे नोडमधील सेक्टर ५, ५A आणि ६ येथील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या गंभीर पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज (मंगळवार, दि. २८ ऑक्टोबर २०२५) सिडको प्रशासनाकडे निर्णायक मागणी केली आहे

रायगड जिल्हाप्रमुख (उरण) मा. आमदार श्री. मनोहर शेठ भोईर साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार, तालुकाप्रमुख श्री महेंद्र गायकर साहेब , वडघर विभाग प्रमुख श्री नंदकुमार मुंडकर, करंजाडे विभाग प्रमुख श्री रोहिदास भोईर यांच्या देखरेखीखाली करंजाडे शहरप्रमुख श्री. संदीप भास्कर चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

👉 प्रमुख मागणी:

  • सेक्टर ५, ५A आणि ६ मधील पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी स्वतंत्र ‘Underground Ground Service Reservoir (GSR)’ पाण्याची टाकी तातडीने उभारावी.
  • GSR मुळे पाण्याचे योग्य नियोजन होऊन सर्व रहिवाशांना मुबलक पाणीपुरवठा होईल.

✅ सिडकोकडून सकारात्मक प्रतिसाद:

यावेळी सिडको पाणीपुरवठा विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर श्री. गायकवाड साहेब आणि श्री. वीरेंद्र पाटील साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. त्यांनी या मागणीला अनुकूलता दर्शवत, हा विषय व्यवस्थापकीय संचालक (MD) यांच्यासमोर अग्रक्रमाने मांडून प्राधान्याने नियोजन करण्याचे आश्वासन दिले.

करंजाडे शहरप्रमुख श्री. संदीप भास्कर चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले की, “शहराचा विस्तार वाढत असताना पाणी आणि मूलभूत सुविधा पुरवण्यात कमतरता भासल्यास, १२.५०% वस्तीत भविष्यात मोठे संकट उभे राहील. सिडकोने तात्काळ दूरदृष्टी ठेवून नागरिकांना न्याय द्यावा. तसेच
करंजाडे-वडघरवासियांच्या समस्या निवारण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष कायम कटिबद्ध असून, योग्य तो न्याय मिळेपर्यंत आमचा पाठपुरावा सुरू राहील.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.