

पनवेल (प्रतिनिधी) दिवाळी सणाच्या औचित्याने इनरव्हील क्लब ऑफ पनवेल तर्फे खांदा कॉलनी येथील बालग्राम अनाथालय येथे दिवाळी फराळ वाटप व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून अनाथालयातील मुलांसोबत दिवाळीचा आनंद उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी मुलांना पारंपरिक दिवाळी फराळ चकली, चिवडा, शंकरपाळे आणि मोतीचूर लाडू यांचे वाटप करण्यात आले. फराळ स्वीकारताना मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदी हास्य हेच दिवाळीचे खरे सौंदर्य ठरले. तसेच, मुलांच्या कल्पनाशक्तीला व सृजनशीलतेला वाव देण्यासाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत मुलांनी विविध रंगांच्या माध्यमातून दिवाळीचे तेजस्वी चित्रण करत सणाचा आनंद अधिक खुलवला.या उपक्रमातून मुलांच्या मनात आनंद, आपुलकी आणि सणाचा उत्साह जागवण्यात यश आले. दिवाळीचा खरा अर्थ माणुसकी जपणे आणि आनंद पसरवणे हा आहे त्यामुळे या उपक्रमातून सामाजिक जाणिव अधिक दृढ झाली.





Be First to Comment