Press "Enter" to skip to content

जिल्हास्तरीय कराटे मार्शल आर्टस स्पर्धेचे जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कुल आवरेचे सुयश


प्रतिनिधी आवरे (सचिन पाटिल)

शिक्षण विभागाच्या तर्फे क्रीडा संकुलन अलिबाग नेहुली येथे भरविण्यात आलेल्या कराटे मार्शल आर्ट्स स्पर्धेत आत्माराम ठाकूर मिशन संचलीत जानकीबाई जनार्दन ठाकूर इंग्लिश मेडियम स्कूल आवरेने उज्वल यश संपादन केले. त्यांनी तब्बल दहा पदकांची लयलूट केली यात अनुक्रमे दोन सुवर्ण दोन रजत आणि एक कांस्यपदक अशी उज्ज्वल कामगिरी केली .

सदर खेळाडूंची निवड ही प्रादेशिक स्तरावर झाले आहे प्रादेशिक स्तरावर निवड करण्यात आलेले सुवर्णपदक विजेते विद्यार्थी कु शौर्य संदीप म्हात्रे इयत्ता सहावी (१४ वर्षाखालील)जाग्रवी जोमा भोईर 17 वर्षाखालील )तसेच रजत पदक विजेते स्पर्धक 17 वर्षे वयोगट अक्षा उत्तम गावंड इयत्ता नववी कुमारी नुपूर किरण पाटील नववी या सर्व विजेते स्पर्धांकांचे उज्वल यश हे विद्यालयांच्या शिरपेचात मनाचा तुरा रोविला आहे विद्यार्थ्यांनी मिळविलेलले यश हे संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष अशोक ठाकूर सर यांना दिलेली भावपूर्ण आदरांजली होय सर्व विद्यार्थ्यानि म्हटले आहे.

सदर विद्यार्थ्यांनाने मिळविलेल्या या उज्वल यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन करणारे क्रीडा व जुडो कराटे मार्शल आर्टस् प्रशिक्षक शिक्षक शुभम ठाकूर सर याचे सर्वस्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे. विद्यालयाच्या मुख्याद्यापीका सौ निकिता म्हात्रे संस्थेचे विश्वस्त श्री वामन ठाकूर सौ अलका ठाकूर सिंधू ठाकूर प्रसाद ठाकूर प्रतीक ठाकूर आदिनाथ ठाकूर श्रीकांत ठाकूर विद्यार्थ्यांचे पालकवर्ग शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.