
पेण, ता. २८ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यामध्ये अवकाळी अतिवृष्टीच्या झालेल्या पावसामुळे जिल्ह्यासह पेण तालुक्यातील भातशेती जमीनदोस्त झाल्यामुळे बळीराजा प्रचंड संकटात सापडला आहे त्यामुळे सरकारने त्यांना तात्काळ हेक्टरी मदत भरपाई द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य हे तांदुळाचे स्तोत्र असून कोकणासह रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी तांदुळाचे पीक घेत असतात मात्र गेल्या काही दिवसांपासून परतीच्या अवकाळी अतिवृष्टीमुळे येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत.एकीकडे कापणीचा हंगाम असताना आलेल्या पावसाने उभे पीक आडवे करून शेतात पूर्णता पाणी साचले आहे त्यामुळे भाताचा दाणा भिजून कोंब आले असून भातशेती जमीनदोस्त झाली असल्याने महाराष्ट्रासह रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण नवनिर्माण सेना शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने लढत असल्याने या अस्मानी संकटात शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ हेक्टरी पॅकेज तात्काळ जाहीर त्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करावे या मागणीसाठी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी यांना याबाबतचे निवेदन आज देण्यात आले आहे.
यावेळी उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर, पेण तालुकाध्यक्ष मनोहर पाटील, उपाध्यक्ष विजय पाटील, सौरभ पाटील, महिला तालुकाध्यक्षा गौरी पाटील, पंकज पाटील, नितेश पाटील, प्रशांत म्हात्रे, जिते अध्यक्ष विवेक घरत, वाशी अध्यक्ष सुहास पवार, हमरापूर अध्यक्ष नमस्कार घरत, कल्पेश पाटील, प्रणव जंगम आदिंसह मनसे सैनिक उपस्थित होते.





Be First to Comment