Press "Enter" to skip to content

पनवेलमध्ये सिलिंडरला लागलेली आग वेळीच विझवली; मोठा अनर्थ टळला


पनवेल दि.२८(वार्ताहर): पनवेल शहरातील लक्ष्मी वसाहत झोपडपट्टी परिसरात सकाळी सिलिंडरला लागलेल्या आगीमुळे मोठी खळबळ उडाली. सुदैवाने, अग्निशमन दलाने योग्य वेळी घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.

ही माहिती मिळताच माजी नगरसेविका दर्शन भोंईर यांनी महापालिकेच्या अग्निशमन दलाला तत्काळ कळविले. त्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विजवली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गॅस सिलिंडरमधून झालेल्या गळतीमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग शेजारील घरांपर्यंत पसरली नाही.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनीही तातडीने मदतीला धाव घेतली. या वेळी राजू कोळी, हसन बागवान, रोशन जाधव, चंद्रकांत जगे आणि इतर नागरिक घटनास्थळी उपस्थित होते. पनवेल महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी परिसरात सुरक्षेचे उपाय वाढवले जाणार आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.