
महिलेचा निर्घण खुन करणाऱ्या आरोपीला पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या महिला तपास पथकाने ठोकल्या बेड्या
पनवेल दि.२८(संजय कदम): पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ गावात एका महिलेचा खून करून सोन्याचे दागिने घेऊन फरार झालेल्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांच्या महिला पथकाने जेरबंद केले आहे.
कुंडेवहाळ गावात एका महिलेचा गळा आवळुन खुन झाला असल्याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यास माहिती प्राप्त झाली होती. त्यावरुन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता सदर ठिकाणी एक महिला नामे संगिता नामदेव म्हात्रे (वय 55 वर्षे, राह घर नं, 471, मु. पो. कुंडेवहाळ) या मयत अवस्थेत आढळुन आल्या. तसेच सदर ठिकाणी केलेल्या चौकशीमध्ये मयत महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागीने हे चोरी झाले असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन मयत महिलेचा मुलगा सवी नामदेव म्हात्रे (वय 36 वर्षे) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन यातील मयत महिलेचा कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी करण्याच्या उद्देशाने गळा दाबुन खुन केला असल्याची फिर्याद नोंद करुन पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयाच्या घटनास्थळी कोणतेही सीसीटिव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने आरोपीताबाबत माहिती मिळवणे अत्यंत अवघड जात होते. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हयाच्या तपासकामीं वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. त्याप्रमाणे घटनास्थळ परिसरातील रहिवाश्यांकडे चौकशी करण्याची कामगिरी महिला सपोनि प्रज्ञा मुंढे, सपोनि सारिका झांझुणें, पोउपनि प्रियांका शिंदे व महिला अंमलदार, पोशि विशाल दुधे यांना देण्यात आली होती. महिला पथकाने व पोशि विशाल दुधे यांनी अत्यंत कौशल्यपुर्ण परिसरातील सुमारे 30 महिला व पुरुष यांच्याकडे तपास केला. त्यामध्ये इसम नामे मोहंम्मद समीर अल्लाउद्दीन अन्सारी (वय 23 वर्षे, रा-कुंडेवहाळ) याच्याकडे केलेल्या तपासादरम्यान त्याने यातील मयत महिलेस 40 हजार रुपये उसने दिले होते. आरोपीताने सदर रक्कम परत मिळणेकरीता मयत महिलेकडे वारंवार मागणी केली होती. तसेच दिलेली रक्कम परत मागण्याकरीता मयत महिलेच्या घरी गेला असता मयत महिलेने पैसे परत करण्यासाठी नकार दिला. त्यामुळे आरोपीताने जाणीवपुर्वक मयत महिलेचा गळा आवळुन खुन केला असल्याचे सांगितले.
खुनाच्या गुन्हयातील आरोपीताबाबत कोणत्याही प्रकारची माहीती नसताना महिला पोलीस पथकाने सखोल तपास करुन, तांत्रीक तपासाच्या आधारे आरोपीताचे नांव निष्पन्न करुन, कौशल्यपुर्ण तपास करुन त्यास अटक उल्लेखणीय कामगिरी केलेली आहे. सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय ऐनपुरे, पोलीस उपायुक्त परि 03, पनवेल प्रशांत मोहीते, सहा. पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले, यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि नितीन ठाकरे, सपोनि प्रज्ञा मुंढे, सपोनि सारिका झांझुणें, सपोनि प्रविण फडतरे, पोउपनि विनोद लभडे, पोउपनि हजरत पठाण, पोउपनि प्रियांका शिंदे, पोलीस हवालदार ज्योती दुधाणे, देवांगी म्हात्रे, महिला पोलीस शिपाई अर्चना देसाई, साधना पवार, ज्योती कहांडळ, सुप्रीया ढोमे, सुशीला सवार, तेजश्री काशिद, स्वाती पाचुपते, पोशि विशाल दुधे यांनी केली.





Be First to Comment