
ग्रामस्थांनी दिली शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख समीर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली एमएसईबी कार्यालयावर धडक
पेण, ता. २५ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील भाल तुकारामवाडी परिसरात चार पाच विद्युत पोल पडल्याने ऐन दिवालीत गाव अंधारात होता.त्यामुळे याबाबत ग्रामस्थांनी शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख समीर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली एमएसईबी कार्यालयावर धडक दिली असता तात्काळ संबंधित अधिकारी यांनी सदरचे विद्युत फुल उभारण्याचे आदेश देत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून पेण तालुक्यात परतीचा पाऊस जोरदारपणे वादळ वाऱ्यासह पडत असल्याने यामध्ये वढाव खारेपाट भागातील जीर्ण झालेले विद्युत पोल वादळ वाऱ्यासह पावसाने पडल्याने भाल तुकाराम वाडी गाव पूर्णता ऐन दिवाळीत चार- पाच दिवस अंधारात होते याबाबत अनेकदा ग्रामस्थांनी संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्याकडे याबाबत विचारणा केले असता त्यांनी उडवावडीची उत्तरे दिली अखेर ग्रामस्थांनी शिवसेना तालुकाप्रमुख समीर म्हात्रे यांच्याकडे याची तक्रार केली असता त्यांनी तात्काळ एमएसईबी कार्यालय येथे ग्रामस्थांसह जाऊन याबाबतची विचारणा केली व सदर परिसरातील पडलेले विद्युत पोल तात्काळ उभे करून लाईट सुरू करावी अशी मागणी केली असता यावर एमएसईबीचे कार्यकारी अभियंता उमेश चव्हाण यांनी संबंधित कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून विद्युत पोल उभे करण्याचे सांगत तात्काळ लाईट सुरु करण्याचे आदेश दिल्याने उपस्थित ग्रामस्थांनी यावेळी समीर म्हात्रे यांचे आभार मानले.



Be First to Comment