
पेण बाजारपेठ मधून सामाजिक कार्यकर्ते हेमंत जैन यांनी निवडणूक लढवावी नागरिकांमध्ये चर्चा
पेण (प्रतिनिधी) :- येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहिर होण्याची शक्यता पाहता नगरपालिका निवडणुकीसाठी अनेक राजकीय पक्ष आपापल्या परीने उमेदवारांची चाचपणी करत असताना पेण शहरातील बाजारपेठ सामाजिक कार्यकर्ते हेमंत जैन यांनी निवडणूक लढवावी अशी चर्चा पेण शहरामध्ये होत आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल दिवाली नंतर वाजण्याची चिन्ह असून सगळीकडे दिवाली निमित्त इच्छुक उमेदवारांचे बॅनरबाजी झलकन्यास सुरुवात झाली आहे.त्यातच यावर्षी पेण नगरपालिका निवडणुकीत एकूण 24 सदस्य निवडून जाणार असल्याने प्रभाग क्रमांक 2 मधून व्यवसायने व्यापारी असणारे सामाजिक कार्यकर्ते हेमंत जैन यांनी बाजारपेठ मधून ही निवडणूक लढवावी अशी चर्चा शहरातील नागरिकांमध्ये होत आहे.



Be First to Comment