
गोदरेज हाऊसिंग फायनान्समार्फत ‘पक्कापता’ अर्थात मालकीचे घर ही नवीन मोहीम सुरू
पनवेल (प्रतिनिधी) गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपची वित्तीय सेवा शाखा असलेल्या गोदरेज कॅपिटलने त्यांच्या उपकंपनी गोदरेज हाऊसिंग फायनान्समार्फत ‘पक्कापता’ अर्थात मालकीचे घर ही नवीन मोहीम सुरू केली आहे. पनवेलसह देशातील उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये परवडणाऱ्या गृहवित्त उपाययोजना पुरवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
ही मोहीम पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या भावनिक प्रवासाचे सुंदर चित्रण करते. तसेच भाड्याच्या जागेतून स्वतःच्या मालकीच्या घरात जाण्यासाठी गोदरेज हाऊसिंग फायनान्सला एक विश्वासार्ह भागीदार म्हणून मान्यता देते.या मोहिमेच्या केंद्रस्थानी एक साधा, सोपा पण सखोल दृष्टिकोन आहे: ‘पक्कापता’ म्हणजेच कायम स्वरूपी पत्ता, हे भारतीय कुटुंबांचे सर्वात मोठे स्वप्न असते. पारंपरिकपणे घर खरेदीसाठी चांगला मुहूर्त म्हणून दिवाळी आणि धनत्रयोदशीचे महत्त्व लक्षात घेत ही मोहीम धोरणात्मक रित्या आखण्यात आली आहे. परवडणाऱ्या गृहनिर्माण वित्तपुरवठ्यासाठी ग्राहक-प्रथम दृष्टिकोन अधोरेखित करून या मानसिकतेचा फायदा करून घेण्याचा कंपनीचा उद्देश आहे, ज्यामुळे टियर-२ शहरांमध्ये घर घेणे अधिक सोपे होईल. कारण तेथील घरे आता परवडणाऱ्या दरांमध्ये उपलब्ध आहेत.



Be First to Comment