

पेण, ता. २० (वार्ताहर) : राज्यामध्ये अवकाळी पावसात झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तात्काळ नुकसान मिळावे या मागणी करीता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज पेणमध्ये भीक मागो आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्रात गेले काही दिवस अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकरी पुर्णता संकटात सापडला आहे.या पावसामुळे राज्यातील हजारो हेक्टर शेती नापीक होऊन शेतकरी उध्वस्त झाला असतानाही राज्यातील महायुतीचे सरकार शेतकऱ्यांचे दिवाळे काढत आहेत सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावे या मागणी करिता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी भीक मागो आंदोलन करण्यात आले.
यावेळी पेण शहरातील दुकानांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांनी भीक मागत आंदोलन केले.यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महाड तालुकाध्यक्ष संदीप सकपाळ, रोहा तालुकाध्यक्ष तुषार खरविले, माणगाव महिला आघाडी प्राजक्ता जाधव, अश्विनी महाडिक, कर्जत तालुकाध्यक्ष ॲड. भाऊसाहेब मोरे, उपाध्यक्ष राम देशमुख, पेण तालुकाध्यक्ष प्रकाश मोकल, पराग वडके, राजु रोटेकर आदिंसह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Be First to Comment