

सुरज हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ. आर.एन.पाटील यांनी जनसेवेचे व्रत हाती घेतले – वनमंत्री गणेश नाईक
पेण, ता. 17 (वार्ताहर) : नवी मुंबईमध्ये गेल्या 21 वर्षांपासून सुरू झालेल्या सुरज हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ. आर.एन.पाटील यांनी जनसेवेचे व्रत हाती घेत असून यामुळेच गोरगरिब रुग्णांना आशेचा किरण मिळाला असल्याचे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सुरज हॉस्पिटलच्या वर्धापनदिनी केले.
नवी मुंबई सानपाडा येथील सुरज हॉस्पिटलचा 21 व्या वर्धापन दिन तसेच नवीन डेंटल क्लिनिकचे उद्घाटन वनमंत्री तथा पालघर जिल्हा पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुरज हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. आर.एन.पाटील, माजी नगरसेवक दशरथ भगत, डॉ.जयाजी नाथ, डॉ. अंजली पाटील, डॉ.उदय पाटील, डॉ. रमा पाटील, डॉ.सुरज पाटील, डॉ. मीनल पाटील या कुटुंबासह येथील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अधिक बोलताना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की मुंबईमध्ये अनेक मोठमोठे हॉस्पिटल आहेत मात्र रुग्णांना तात्काळ आणि कमी खर्चात सुविधा देणारे सुरज हॉस्पिटल एकंदर पाहता डॉ.पाटील यांचे संपूर्ण कुटुंब रुग्णसेवेची निगडित आहेत त्यामुळे शरीराच्या मेंदूपासून संपूर्ण अवयवां पर्यंत डॉक्टरांनी आपले कुटुंब घडवून नवी मुंबईसह रायगड, कोकण येथील गोरगरीब रुग्णांसाठी एक आरोग्य सेवेची पर्वणी दिल्याने त्यांच्या 50 खाटांच्या या हॉस्पिटलची येत्या काळात अधिक प्रगती होऊ दे असे त्यांनी शेवटी सांगितले.तर 21 वर्षांपूर्वी सानपाडा या ठिकाणी हॉस्पिटलची निर्मिती केली त्यादरम्यान अनेक अडचणींचा सामना सुद्धा करावा लागला मात्र माझ्या पत्नीची मिळालेली साथ पाहता आणि माझ्या वैद्यकीय क्षेत्रातल्या अनुभव मला येणाऱ्या प्रत्येक रुग्णांकडून मिळत गेला आणि हा हा म्हणता आज सुरज हॉस्पिटला 21 वर्ष पूर्ण झाले हॉस्पिटलच्या माध्यमातून येणाऱ्या रुग्णांना सर्वप्रथम कॅशलेस सेवा देऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुद्धा या माध्यमातून दिला जात असल्याचे डॉ.आर.एन. पाटील यांनी सांगितले.
यावेळी सुरज हॉस्पिटल येथे वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या असंख्य डॉक्टर्स, कर्मचारी यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.



Be First to Comment