
पनवेल दि.१७ (संजय कदम) : तळोजा औद्योगिक वसाहतीत पडघे फाटा परिसरात खाद्य तेलाने भरलेल्या एका ट्रकला आज अचानक आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचत सदर आग विझवली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पनवेल तळोजा रस्त्यावर आज तलोजा एमआयडीसीहद्दीत पडघे फाटा परिसरात जात असलेल्या एका तेलाच्या कंटेनरला अचानक भीषण आग लागली. स्थानिकांनी या घटनेची माहिती तळोजा वाहतूक पोलिसांना दिली. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचत सदर आगीवर नियंत्रण मिळवले.



Be First to Comment