
आमदार जबाबदारीतील…
1 वर्ष जनसेवेचे – विश्वासाचे – विकासाचे…
15 ऑक्टोबर, 2024 ; माझ्या आयुष्यातील एक सुवर्ण दिवस!
22 वर्ष कार्यकर्ता म्हणून सातत्य पूर्ण कार्य करत राहिलो, आणि त्याचे फळ पक्ष नेतृत्वाने दिले ते आमदार हा बहुमान देऊन!
आजच्याच दिवशी 1 वर्षापूर्वी विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती झाली आणि शपथ विधी संपन्न झाला.


तत्कालीन उपमुख्यमंत्री व सध्याचे मुख्यमंत्री सन्मा. देवा भाऊ, तेंव्हाचे प्रदेश अध्यक्ष व सध्याचे महसूल मंत्री सन्मा चंद्रशेखर बावनकुळे जी, कोकण चे नेते व भाजप प्रदेश अध्यक्ष सन्मा रवींद्र चव्हाण जी व सर्वच वरिष्ठ यांनी जे काही प्रेम आणि ताकद मला दिली केवळ आणि केवळ त्यामुळेच माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यातून नेतृत्व घडू शकले. त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच!
माझ्यावर प्रेम करणारे नागरिक, माता भगिनी, युवा शक्ती, जेष्ठ नागरिक यांच्या प्रचंड मोठ्या सदिच्छा व आशीर्वाद यामुळे मी हा संघर्षमय प्रवास यशस्वी करू शकलो, मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
आमदार म्हणून जबाबदारी मिळाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून कामाला लागून अनेक प्रलंबित प्रश्न व विषयांवर अभ्यास करून वाचा फोडण्याचा प्रयत्न केला.



पनवेल साठी शिलार धरणात पाण्याचा विशेष कोटा मंजूर करून घेण्याचा प्रश्न,
नैना प्रभावित क्षेत्रातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे प्रश्न,
नैना क्षेत्रातील बंद असलेल्या रेजिस्ट्रेशन चा प्रश्न,
BMTC कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 10 लाख मोबदला मिळवून देण्याचा प्रश्न,
सिडकोच्या घरांच्या वाढीव किमती कमी करण्याचा प्रश्न,
पनवेल बस स्थानाकाचा रखडलेला प्रश्न,
नवीन पनवेल सेक्टर एक ते 19 मधील री डेव्हलपमेंट संदर्भातील सिडको कडून होणाऱ्या अडचणींचा प्रश्न…
असे अनेक महत्त्वाचे व नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न अधिवेशनात व योग्य अधिकाऱ्यांकडे मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत यातील अनेक प्रश्न सुटले आहेत तर अनेक प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहेत.
गेल्या एक वर्षात आपण सर्वांनी भरभरून दिलेले प्रेम प्रत्येक कार्यक्रमाच्या निमित्ताने दिलेले आशीर्वाद लाडक्या बहिणींची मागे उभी राहिलेली ताकद व युवाशक्तीने भरभरून दिलेले सहकार्य यामुळे या वर्षात आपण यशस्वी कामगिरी करू शकलो आहे.
या पुढील कालावधीमध्ये आपण सर्वजण असेच माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहून एक परिवार म्हणून आपण सर्वांच्या कल्याणासाठी व आपल्या पनवेल विभागाच्या विकासासाठी एकत्रितपणे प्रयत्न करूया!



मला खात्री आहे आपले प्रेम व सदिच्छा माझ्यासोबत कायम राहिल्यास आपण मनात जे जे आणून तेथे अवश्य शक्य करू शकू!
आपण माझे प्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या आपल्यापर्यंत येणाऱ्या समस्या सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून शेवटच्या व्यक्तीपर्यंत आपली मदत पोहोचणे शक्य होईल
माझ्यावर प्रेम करणारे माझे भारतीय जनता पार्टीचे सर्व सहकारी, राज्यभरातील भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते ज्यांनी नेहमीच मला खंबीर साथ दिली अशा सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार!
आपल्या सर्वांचे मानावे तितके आभार कमीच आहेत,परंतु तरीही आपले मनःपूर्वक आभार!



Be First to Comment