Press "Enter" to skip to content

पनवेल महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात ठाकरे गट रस्त्यावर

उ बा ठा शिवसेनेचे महापालिकेवर टाळेबंद आंदोलन ; “काम करा नाहीतर खुर्ची सोडा” महापालिकेला थेट इशारा

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महानगरपालिकेच्या निष्क्रियतेचा आणि भ्रष्ट कारभाराचा निषेध करण्यासाठी आज शिवसेनेने रणसंग्राम छेडला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने च्या सैनिकांतर्फे आज पनवेल महापालिकेवर टाळे बंद आंदोलन करण्यात आले.

महापालिकेच्या कारभाराने त्रस्त नागरिकांच्या भावना उफाळून आल्या आहेत. अनेकदा निवेदनं देऊनही काहीच हालचाल न झाल्याने अखेर शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर उतरले आहे.पनवेलकरांच्या हक्कासाठी आम्ही टाळं लावत आहोत!प्रशासन झोपलंय,पण जनता आता जागी झाली आहे.पनवेल महापालिकेने काम करावं नाहीतर खुर्ची सोडावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

शहरातील रस्ते,पाणीपुरवठा,स्वच्छता, आणि नागरिकांच्या मूलभूत गरजा या सर्व बाबींवर प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे.जनतेच्या पैशावर चालणारी महापालिका,पण जनतेच्या प्रश्नांकडे पाठ फिरवणारी यंत्रणा हे आम्ही सहन करणार नाही असा घणाघात शिवसेनेने केला आहे.यावेळी पनवेलकरांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारं प्रशासन आम्हाला नकोय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत झालेलं हे आंदोलन पूर्णतः शिस्तबद्ध आणि ठाम होतं.मात्र, त्या आंदोलनातील आक्रमकतेने महापालिकेच्या अधिकाऱ्यांची धावपळ उडाली.अनेक स्थानिक नागरिकांनीही या लढ्याला पाठिंबा दिला.पनवेलचा विकास कागदावर नको,जमिनीवर हवा..जोपर्यंत प्रशासन जागं होत नाही,तोपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी शिवसेना उपनेते बबनदादा पाटील, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, महानगर समन्वयक दिपक घरत, महानगर प्रमुख अवचित राऊत, महानगर संघटक गुरुनाथ पाटील, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे, तालुका प्रमुख संदीप तांडेल, शहर प्रमुख प्रवीण जाधव, शहर प्रमुख यतीन देशमुख, शहर प्रमुख सदानंद शिर्के, शहर प्रमुख रामदास गोवारी, शहर प्रमुख सूर्यकांत म्हसकर, शहर प्रमुख गुरु म्हात्रे, शहर प्रमुख प्रदीप केणी, युवासेना जिल्हाधिकारी पराग मोहिते, विधानसभा अधिकारी अजय पाटील, महिला आघाडी उपजिल्हा संघटिका सौ. रेवती सकपाळ, विधानसभा संघटिका सौ. सुजाता कदम, उपतालुका संघटिका सौ. तनुजा झुरे, उपमहानगर संघटिका सौ. रुपाली कवळे, शहर संपर्क संघटिका सौ. समीक्षा पांगम, सौ. श्रद्धा जाधव, शहर संघटिका सौ. संगीता राऊत, शहर संघटिका सौ. मालती पिंगळा, शहर संघटिका सौ. सामीना कुडाळकर, शहर संघटिका सौ. अर्चना कुळकर्णी, शहर संघटिका सौ. ज्योती मोहिते, शहर संघटिका सौ. संपदा धोंगडे यांच्या सह शिवसेना पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.