
कौतिके फाउंडेशनचा “मिशन – ४ : हर मदद, एक नई उम्मीद” उपक्रम
सातारा / उरण (ऑक्टोबर २०२५):
कौतिके चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे “मिशन – ४ : हर मदद, एक नई उम्मीद” या मोहिमेअंतर्गत महाबळेश्वर व उरण तालुक्यातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
महाबळेश्वर तालुक्यातील सौंदरी जिल्हा परिषद शाळेत ०४ ऑक्टोबर रोजी येरणे केंद्रातील १२ शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले. या कार्यक्रमाचे सौजन्य श्री. संतोष गायकवाड आणि श्री. ज्ञानेश्वर सकपाळ यांचे लाभले.
तर ११ ऑक्टोबर रोजी अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा, चिरनेर (ता. उरण, जि. रायगड) येथे २२३ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सौजन्य श्री वैभवलक्ष्मी एंटरप्रायझेसचे भागीदार सौ. आरती बाळेकर व श्री. मंगेश खंदारे यांचे लाभले.
या दोन्ही उपक्रमांना फाउंडेशनचे सदस्य श्री. ज्ञानेश्वर जाधव, श्री. आशिष मिश्रा, श्री. अभिनय सिंग, श्री. निलेश कुटे, श्री. ओंकार गंधे, श्री. अभिषेक सिंग, श्री. वैभव जाधव,श्री. विजय जाधव, श्री. संतोष जाधव, सौ.जयश्री सुतार उपस्थित होते.
उपक्रमाचा उद्देश म्हणजे शिक्षणासाठी झटणाऱ्या ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या शिक्षणाला आवश्यक साहित्य पुरविणे हा आहे.



Be First to Comment