
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल मार्फत पनवेल मध्ये फुलणार “फुलपाखरू उद्यान”
पनवेल : रोटरी चे माजी प्रांतपाल पनवेल मधील जेष्ठ डॉक्टर गिरीश गुणे यांच्या मार्गदर्शना खाली पनवेल महानगर पालिका व रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल च्या सहयोगाने पनवेकरांच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा “फुलपाखरू उद्याना” च्या रूपाने येऊ पहात आहे आणि त्याचा भूमिपूजन समारंभ आज रविवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी भूखंड क्र .478 व 482, महानगरपालिका गार्डन साईनगर रोड ,पनवेल येथे सकाळी.माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर प्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार बाळाराम पाटील, विस्टा फूड चे संचालक भुपिंदर सिंग, विस्टा फूड चे सल्लागार चंद्रशेखर सोमण, पनवेल महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्ये , उपायुक्त विधाते, रोटरी प्रांत 3131 चे प्रांतपाल रो. संतोष मराठे, पुढील वर्षाचे प्रांतपाल रो. नितीन ढमाले नियोजित प्रांतपाल रो. चारू श्रोत्री, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, बबन पाटील, वाय टी देशमुख, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगर सेवक गणेश कडू, नितीन पाटील, मनोहर म्हात्रे, डॉ. अरुण भगत,जयंत पगडे, रुचिता समेळ लोंढे, डॉ.सुरेखा मोहोकर, प्रीती जॉर्ज, सारिका भगत, दर्शना भोईर, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट चे सदस्य या फुलपाखरू उद्यानाचे सल्लागार दिवाकर ठोंबरे, रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल चे अध्यक्ष अनिल ठकेकर, सचिव अतिश थोरात, प्रोजेक्ट चेअरमन ऋषिकेश बुवा यांचे सह सर्व रोटरी सदस्य, एन्स व साई नगर पारिसरातील जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Be First to Comment