Press "Enter" to skip to content

बेताच्या परिस्थितीतही गगनभरारी

उरण कोटगाव येथील पार्थ भोईरची राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई

उरण : प्रतिनिधी

वेटलिफ्टिंग हा एक स्पर्धात्मक ताकतीचा खेळ आहे. या खेळाचे मुख्य दोन प्रकार आहत. खेळाडू तीन प्रयत्नामध्ये सर्वात जड वजन उचलण्याचा प्रयत्न करतात ,आणि सर्वात जास्त वजन यशस्वीपणे उचलणारा खेळाडू जिंकतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त हा खेळ आहे . आणि तो ऑलिम्पिक तसेच इतर अनेक स्पर्धांमध्येहि खेळला जातो. या खेळाने शारीरिक शक्ती, आरोग्य तंदुरुस्ती वाढवण्यासाठी महत्त्वाचा आहे .याव्यतिरिक्त हे खेळाडूंना स्नायू आणि सौंदर्यात्मक शरीर विकसित करण्यासही मदत करते.

उरण तालुक्यातील कोट नाका गावचा पार्थ मिलिंद भोईर याने दिल्लीत डब्ल्यूपीआरएफ या स्पर्धेत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. दिनांक ४ व ५ ऑक्टोबर २०२५ रोजी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत पार्थ ने हि चमकदार कामगिरी केली आहे.

सामान्य कुटुंबात जन्मलेला घरची बेताची परिस्थिती आई गृहिणी व वडील मिलिंद भोईर रिक्षा चालक असून अशा कठीण परिस्थितीत त्यांनी दिल्ली येथे झालेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत देशभरातील अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. पार्थाने जिद्द, मेहनतीच्या जोरावर सुवर्णपदकावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

पार्थच्या या नेत्र दीपक कामगिरीमुळे त्यांचे पालक ,कोटगाव ग्रामस्थ, शिक्षक, प्रशिक्षक, मित्रपरिवार अशा सर्वच स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पार्थने आपल्या चमकदार कामगिरीमुळे आपल्या कोटगाव,उरण तालुकाच नाही तर देशात आपल्या गावाचे नाव उंचावले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.