

पेण. ता. ९ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील बेलवडे- मुंगोशी भागातील असणाऱ्या आदिवासी समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात मागे न पडता त्यांनीही उंच भरारी घ्यावी याकरिता प्रवीण पाटील यांनी आपल्या स्वकष्टाने येथील विद्यार्थ्यांना दप्तर वाटप केल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्राकरिता त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे प्रतिपादन खासदार धैर्यशील पाटील यांनी बोलताना केले.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दक्षिण रायगड युवा मोर्चा चिटणीस प्रवीण पाटील यांनी बेलवडे- मुंगोशी हद्दीतील आदिवासी शाळेतील साधारण ५०० विद्यार्थ्यांना दप्तर वाटपाचा कार्यक्रम बेलवडे येथील सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला भाजप जिल्हा महामंत्री वैकुंठ पाटील, माजी जि.प.सभापती डी.बी.पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, संयोजक तथा चिटणीस प्रवीण पाटील, तालुकाध्यक्ष संजय डंगर, सरचिटणीस रोशन चाफेकर, माजी उपसभापती बाळाराम पाटील, बेलवडे सरपंच हरीश पाटील, वामन पाटील, मोहन पाटील, स्वप्निल म्हात्रे, संजय घरत, विवेक म्हात्रे, गणेश पाटील, अमित पाटील, प्रशांत पाटील आदिंसह शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.बेलवडे ग्रामपंचायत हद्दीतील अनेक विद्यार्थी आजवर चांगल्या आणि योग्य त्या उच्च पदावर पोहचले आहेत तसेच आत्ताच्या सुद्धा विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपले नाव लौकिक करावे मात्र याकरिता त्यांना शैक्षणिक दृष्ट्या कोणतीही अडचण येऊ नये हीच भावना मनात बालगून विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्याच्या मानस आम्ही ठेवला असल्याचे प्रवीण पाटील यांनी यावेळी सांगितले.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रधानवाडी, मालवाडी, बेलवडे खुर्द, बेलवडे बुद्रुक, भोरकस, मालेवाडी, वडाचा दांड अशा शाळेमधील जवळपास ५०० विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप करण्यात आले.



Be First to Comment