

पेण, ता. 8 (प्रतिनिधी) -: बौद्धजन पंचायत समिती शाखा अलिबाग यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या गट क्रमांक 3 च्या चरी येथील सम्यक बुद्धविहार येथे वर्षावास मालिकेची सांगता करण्यात आली.
यावेळी बुद्धविहारात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्यास सर्वप्रथम आरपीआय तालुका अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यांनतर जेष्ठ बौद्धाचार्य परशुराम राघो ओव्हाळ यांच्या पूजा पाठचा कार्यक्रम पार पडला असता त्यांनी बौद्ध धम्म जिज्ञासा या ग्रंथाचे वाचन करत त्याचे विश्लेषण उपस्थित बांधवांना करून दिले व तथागत भगवान गौतम बुद्धांच्या आचरणाच्या माध्यमातून प्रगतीचा मार्ग आपल्याला आपोआपच मिळत जात असल्याचे सांगत बौद्ध धम्माच्या आचार विचारांचे आपण ज्ञान घेतले पाहिजे तरच आपली प्रगती अधिक होऊ शकते असे त्यांनी सांगितले.
तरी यावेळी उपस्थित बौद्ध बांधवांनी भोजनदान करून दुपारच्या सत्राला सुरुवात करण्यात आली असता यामध्ये तालुका खजिनदार संतोष गायकवाड तसेच चरी शाखेचे अध्यक्ष तथा अलिबाग आरपीआय तालुका अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी उपस्थित मान्यवरांचे तसेच तसेच तालुक्यातील आजी माजी पदाधिकाऱ्यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान केले.यावेळी दुपारी सुरू झालेल्या सत्रात विजय गायकवाड यांनी बौद्ध धम्म जिज्ञासा या पुस्तकातील पाच खंड आणि त्या प्रत्येक खंडातील प्रश्नोत्तरे याचा आढावा घेऊन वर्षावासाचे महत्त्व कथन केले.तर संजय जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी बौद्धाचार्य परशुराम ओव्हाळ, ना.गो. गायकवाड, शुभांगीताई जाधव, संजय गायकवाड, विष्णू मोरे, सुमित कांबळे, कृष्णा गायकवाड, भारतीय बौद्ध महासंघाचे सभासद कदम, प्रभावती मोरे, माता रमाई महिला मंडळाच्या सचिव, संचिता गायकवाड, संतोष साळवी, अमर गायकवाड, प्रकाश गायकवाड, सुमित सुशील, ओव्हाळ गायकवाड, विलास गायकवाड, दीपक सोनवणे, मंगेश जाधव, ओम जाधव पूजा सोनवणे, स्नेहल गायकवाड आदिंसह बौद्ध बांधव, उपासक, उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Be First to Comment