Press "Enter" to skip to content

पेण विधानसभा प्रभारी मनोज कांबळे यांचे मत

महेंद्रशेठ घरत यांची जिल्हाध्यक्षपदाची कारकीर्द उत्तम !

उलवे, ता. ७:  “महेंद्रशेठ घरत तुम्ही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून उत्तम काम करताय. जिल्ह्यातील तुमचे तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचे काम कौतुकास्पद आहे. त्याबद्दल अभिनंदन,” असे पेण विधानसभा प्रभारी मनोज कांबळे यांनी पेण येथे कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मागर्दशन करताना मत व्यक्त केले. पेण येथे काँग्रेसची आढावा बैठक मंगळवारी संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठकी झाली. 

“कार्यकर्त्यांनी आपापसातील संवाद वाढवावा, एकमेकांच्या सुख-दुःखात जा, अनेक जुनेजाणते कार्यकर्ते आहेत. त्यांना सन्मानाने आपल्याकडे बोलवा. मतभेद मिटवा, व्हॉटसअप युनिर्व्हिसीटूतून बाहेर पडा, अडल्यानडल्या कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून जा,” असा सल्ला जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी पेण येथील  कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दिला.   

“मतदारसंघात पोकळी निर्माण झाली आहे, पण मी जिल्हा परिषद निवडणूक लढवीन, ” असे पर्यावरण विभागाचे अध्यक्ष राजू पाटील यांनी सांगितले.

तीन ते पाच जागा लढायला हव्यात. वाशी, वडखळ पंचायत समितीच्या जागा लढविणार, असे काही कार्यकर्त्यांनी मत व्यक्त केले. 
यावेळी पेण विधानसभा प्रभारी मनोज कांबळे, सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, माजी सरचिटणीस चंद्रकांत पाटील, तालुकाध्यक्ष अशोक मोकल, शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, जिल्हा सरचिटणीस देवेंद्र म्हात्रे, रोहित म्हात्रे आदी मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.