Press "Enter" to skip to content

एक ऑगस्ट महसूल दिनानिमित्त पनवेलमध्ये विशेष सप्ताहाचे आयोजन

पनवेल : प्रतिनिधी

एक ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने पनवेलच्या महसूल विभागाकडून एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान राज्यभरात विशेष सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहादरम्यान पनवेल महसूल विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात महसूल संवर्गातील अधिकारी व कर्मचारी वर्ग, तसेच सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग असेल. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी एक विशेष सत्कार समारंभही आयोजित केला जाणार आहे.हा सोहळा उद्या नवीन शासकीय इमारत पनवेल येथे सकाळी अकरा वाजता होणार असून प्रसिद्ध इतिहासकार प्रशांत देशमुख प्रमुख पाहुणे असणार आहे अशी माहिती पनवेल चे प्रांताधिकारी पवन चांडक यांनी दिली

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.