

पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या विज्ञान संघटना व पर्यावरण दक्षता मंडळ, एनव्हायरो व्हिजिल, मुंबई विद्यापीठ आणि असोसिएशन ऑफ टीचर्स इन बायलॉजिकल सायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमानाने विज्ञान संघटनेचे उदघाटन आणि पोस्टर्स प्रदर्शनाचे आयोजन आज करण्यात आले. या उद्दघाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू व आंतरराष्ट्रीय खारफुटी तज्ञ मा. प्रो. डॉ. संजय देशमुख , पर्यावरण दक्षता मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. पुर्षोत्तम काळे, पर्यावरण दक्षता मंडळाच्या प्रकल्प व्यवस्थापक रुपाली शैवाले व पर्यावरण दक्षता मंडळाच्या सचिव संगीता जोशी यांची उपस्थिती लाभली होती.
तसेच या प्रसंगी प्राचार्य प्रो.डॉ. एस. के. पाटील , विज्ञान शाखेच्या प्रमुख डॉ. जे. एस. ठाकूर , अंतर्गत गुणवत्ता हमीकक्ष समन्वयक डॉ. बी. डी. आघाव, प्राणीशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ.एम.ए.म्हात्रे व विज्ञान संघटनेचे प्रमुख प्रा. डॉ. वाय. एस. मुनीव तसेच सर्व विज्ञान विभागांचे विभागप्रमुख यांनी उपस्थिती दर्शविली.
सर्वप्रथम प्रमुख पाहुणे प्रो. डॉ. संजय देशमुख यांच्या हस्ते प्राणीशास्त्र विभाग व पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पोस्टर्सच्या प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. या प्रदर्शनात १२० विविध पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमास १०१ विद्यार्थी सहभागी झाले होते.
त्याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ. एस. के. पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना महाविद्यालयाच्या कीर्तीचा मागोवा घेऊन महाविद्यालयामध्ये पर्यावरण संवर्धनात राबवल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रा. एस. डी. चांडवेकर यांनी विज्ञान संघटनेच्या उपक्रमांबद्दल आढावा दिला तसेच प्रमुख पाहुणे मा. प्रो. डॉ. संजय देशमुख यांचा परिचय उपस्थितांना करून दिला.
याप्रसंगी पर्यावरण दक्षता मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. पुर्षोत्तम काळे यांनी त्यांच्या भाषणात पर्यावरण दक्षता मंडळविषयी थोडक्यात माहिती दिली त्याचबरोबर पर्यावरण दक्षता मंडळा मार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमाचा आढावा घेतला. रुपाली शाईवाले यांनी पर्यावरण दक्षता मंडळाचे सदस्य होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले व येणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आव्हान केले.
या व्याख्यानामध्ये प्रमुख पाहुणे प्रो. डॉ. संजय देशमुख यांनी खारफुटी या विषयावर मार्गदर्शन केले, तसेच विद्यार्थ्यांना संबोधताना असे म्हणाले की, सर्वांगीण विकासाचे उत्तम उदाहरण म्हणजे आपले महाविद्यालय तसेच ग्रामीण आणि शहरी भागाला जोडणारा दुवा म्हणजे चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय त्याचबरोबर महाविद्यालयाकडून तुम्हाला चांगला वसा म्हणजे “दैवाने मिळालेले शिक्षण आहे”. त्यानंतर जागतिक खारफुटी दिवसाविषयी माहिती दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रसायनशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या विद्यार्थिनी कु.निकिता सोबट आणि कु. सृष्टी पाटील यांनी केले. तसेच जैवतंत्रज्ञान विभागाच्या प्रा. एम. डी. वैशंपायन यांनी कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन केले.





Be First to Comment