
खांब,दि.२९ (नंदकुमार मरवडे)
रोहा पंचायत समितीअंतर्गत चिल्हे केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद रायगड जिल्हा परिषद शाळा, चिल्हे येथे पार पडली. केंद्रप्रमुख मान.श्री जगन्नाथ आब्दागिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद झाली.
धानकान्हे आदि वाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री मिलिंद कोरडे सर यांनी udise प्रणाली मध्ये झालेले बदल व ऑनलाईन कामाची सखोल अशी माहिती दिले. आणि या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. मढाळी बु.शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका श्रीम सुजाता कांबळे मॅडम यांनी उल्हास अँप व नवसाक्षर यांची माहिती ऑनलाईन कशी भरावी यासंदर्भात प्रत्यक्ष सविस्तर मार्गदर्शन केले. यानंतर या शिक्षण परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी तालुका स्तरावरून पुगाव केंद्राच्या साधन व्यक्ती आदरणीय सौ मानसी कदम मॅडम यांनी इ. 1ली गणित या विषयाचे पुस्तकाचे परीक्षण करून त्या बदल सखोल असे मार्गदर्शन केले.या विषयांवर उदाहरणासह अभ्यासपूर्ण माहिती कदम मॅडम यांनी दिली आणि मार्गदर्शन केले.
शेवटच्या सत्रात पुगाव केंद्राचे प्रमुख श्री जगन्नाथ आब्दागिरे यांनी शिक्षण परिषदेचे महत्व व गरज याबद्दल मार्गदर्शन केले.तसेच विद्यार्थी सुरक्षा बाबतीत 1 ते 8 प्रपत्र भरावे व त्यानुसार अंमलबजावणी केलीं का याची पडताळणी केली.निपुण भारत अभियान, विद्यार्थी अध्ययन स्तर निश्चिती, आपत्कालीन परिस्थितीत व्यवस्थापन,15 ऑगस्ट रोजी कवायतीचे संचलन करून व्हिडिओ दिलेल्या लिंकवर अपलोड करावे अशा सूचना दिल्या.तसेच 13 मे 2025 चे शासन निर्णय विद्यार्थी सुरक्षा परिपत्रक वाचन करून त्यानुसार अंमलबजावणी करण्यासाठी सांगितले. आदिवासी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे इत्यादी प्रशासकीय विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
तत्पूर्वी माहे जुलै 2025 चे शिक्षण परिषद ची सुरुवात ही आद्य दैवत सरस्वती माता व सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली..या परिषदेला केंद्राचे केंद्रप्रमुख श्री जगन्नाथ आब्दागिरे तसेच पुगाव केंद्राचे साधन व्यक्ती सौ मानसी कदम तसेच केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्री निवास थळे सर तसेच केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.या प्रसंगी चिल्हे शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.नरेंद्र महाडिक उपाध्यक्ष सौ. मेघना महाडिक सौ कल्याणी महाडिक,श्री यशवंत लाडगे अंगणवाडी सेविका सौ सुनीता लोखंडे मदतनीस भारती शिंदे पालक कावेरी लोखंडे सौ अश्विनी महाडिक इ.पालक व सदस्य परिषदेला उपस्थिती होते…





Be First to Comment