
पनवेल दि. २८ ( वार्ताहर ) : शिवसेना पक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, अखंड महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख कणखर, निडर, स्वाभिमानी, संयमी, लढवय्या, ऊर्जावान, विश्वासू, लाखो निष्ठावंत शिवसैनिकांचा लोकप्रिय नेता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसा निमित्त उदंड निरोगी दीर्घायुष्याच्या सुख, शांती, समृद्धी, यश, कीर्ती, ऐश्वर्य, सामर्थ्य* लाभो आपल्या सकल इच्छा, आकांक्षा, मनोकामना पुर्ण होवोत या करीता शिवसेना कळंबोली शहर शाखेच्या वतीने शिवमंदिर मंदिर येथे शंकराला अभिषेक तसेच होमहवन पुरुषोत्तम सुभेदार पुरोहित यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी शंकरांच्या चरणी प्रार्थना करण्यात आली, याप्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आत्माराम गावंड, शिवसेना कळंबोली शहर शाखेचे शहरप्रमुख सुर्यकांत म्हसकर,शहर समन्वयक सुहास शिंदे, शहर संघटक अक्षय साळुंखे, महेश गुरव, अनिकेत कन्हेरे, अक्षय वाघोले, किरण ढवळे, अनंतराव घोरपडे, धनाजी उतेकर, बापू इथापे, विक्रम ठाकरे, भीमराव गरजे, शिवाजी शिंदे, तुषार निढाळकर महिला पदाधिकारी शहर संघटिका ज्योती मोहिते, निशा जाधव, मनीषा वचकल, जाधव ताई आदी उपस्थित होते .




Be First to Comment