
रस्ता बाधितांचा पुन्हा एकदा बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा…
मुंबई प्रतिनीधी : (सतिश वि.पाटील)
कल्याण – शीळ रस्त्यातील वाहतूक कोंडीचे एकमेव कारण म्हणजे येथील रस्ता बाधितांना तिसऱ्या मार्गीकेचा न दिलेला मोबदला. शासनाकडून हा मोबदला देण्याचे मान्य झाले असले तरी तशी मानसिकता अजूनही तयार झालेली नाही. त्यामुळे या रस्त्यामध्ये अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी सातत्याने होत आहे.
कल्याण – शीळ रस्त्यातील तिसऱ्या मार्गीकेचा जमीन मालकांना मोबदला दिला असता तर या तिसऱ्या मार्गिकेतून काटई चौकातून कल्याण, डोंबिवली तसेच अंबरनाथ, बदलापूर दिशेने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचानकांना या मार्गिकेचा उपयोग झाला असता. अस्तित्वातील ३० मीटर रस्ता असताना रस्ता बाधितांना मोबदला न दिल्यामुळे हा रस्ता २० ते २२ मीटर रुंद झाल्याकारणाने प्रत्येक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.या वाहतूक कोंडीचा सर्वात जास्त फटका शाळकरी विद्यार्थी, चाकरमानी, रुग्णवाहिका यांना होत आहे. काल सुद्धा सोनारपाडा येथे एक दूचाकी स्वार डंपर खाली येऊन चिरडला गेला.
“कल्याण – शीळ रस्ता बाधीतांना मोबदला मिळावा याकरिता मागील सहा वर्षांपासून संघर्ष सुरू आहे.या रस्त्यातील तिसऱ्या मार्गिकेचा मोबदला न दिल्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. रस्ता बाधितांना मोबदला हा आज ना उद्या मिळेलच परंतु या कारणामुळे वाहन चालकांना तासनतास या वाहतूक कोंडीत अडकून राहावं लागत आहे. रस्ता बाधितांना मोबदला न दिल्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे पाहता वाहन चालकांचा संताप वाढत चाललेला आहे. या वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या वाहन चालकांकडून होत असलेली आंदोलन करण्याची सूचना व कल्याण – शील रस्ता बाधितांचा प्रलंबित असलेला मोबदल्याच्या विषयाच्या अनुषंगाने गणेशोत्सव नंतर लगेचच आम्ही पुन्हा एकदा बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेणार आहोत.”
श्री गजानन जयवंत पाटील
प्रमुख संघटक – सर्वपक्षीय युवा मोर्चा
नेतृत्व – कल्याण – शिळरस्ता बाधित शेतकरी.




Be First to Comment