Press "Enter" to skip to content

लोकनेते दि.बा.पाटील साहेबांनंतर कामगारांना आधार वाटणारा एकमेव नेता महेंद्रशेठ घरत! 


JNPT स्थापनेवेळी स्वर्गीय लोकनेते दि.बा पाटील साहेबांनी स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्य तसेच कामगारांना न्याय देण्याचे काम केले. परंतु पाटील साहेबांच्या निधनानंतर मशरूम सारख्या उगवलेल्या कामगार संघटना व्यवस्थापनांच्या ताटाखालचे मांजर बनून स्थानिक प्रकल्पग्रस्त कामगारांना देशोधडीला लावण्याचे काम करत आहेत. JNPT मधील सफाई कामगार,स्पीडी मल्टीमोटर्स मधील सर्व कामगारांना राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या रूपाने एकमेव आशेचा किरण दिसत आहे त्यामुळे त्यांनी महेंद्रशेठ घरत यांच्या न्यू मेरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे सभासदत्व स्विकारले आहे.

स्पीडी मल्टीमोटर्स सोनारी या कंपनीचा JNPT बरोबरच्या कराराची मुदत संपत आहे. येथे सात संघटना असल्यामुळे एक -दोन संघटनांना हाताशी धरून बाकीच्या कामगारांना वेठीस धरण्याचे काम स्थानिक व्यवस्थापन करत आहे, त्यामुळे सर्व कामगार एकत्र होवून महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्व स्विकारले आहे. JNPT मधील कंत्राटी सफाई कामगारांच्या दोन युनियन असल्यामुळे व्यवस्थापन त्याचा गैरफायदा घेवून त्यांना वाटेल त्या प्रमाणे वागवत  आहे. या सर्व कामगारांनी सुद्धा दोन्ही युनियन झिडकारून कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्व स्विकारले आहे.

DPW मधे सुरुवातीला महेंद्रशेठ घरत यांची युनियन होती त्यावेळी स्थानिकानाचं नोकरीत प्राधान्य दिले जायचे परंतु स्थानिक पुढाऱ्यांनी निवडणुकी वेळी स्वतःच्या स्वार्थासाठी कामगारांची युनियन तोडली.परंतु तेव्हा पासून परप्रांतीयांची भरती सुरु झाली व स्थानिक कामगारांवर अन्याय होवू लागला. याची जाणीव DPW च्या कामगारांना होवून त्यांनी पुन्हा राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्व स्विकारले आहे.

दि.बा. पाटील साहेबांनंतर स्थानिक कामगारांना राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत हेच आशेचा किरण दिसत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.